Starbucks Coffee Recipe Leak: जागतिक स्तरावर प्रसिद्ध कॉफीहाऊस कंपनी 'स्टारबक्स'च्या (Starbucks) एका माजी कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. स्टारबक्सने कर्मचार्‍याला काही काळासाठी कामावरुन काढून टाकलं आणि याचा राग अनावर होऊन या कर्मचाऱ्याने कंपनीशी संबंधित काही तपशील लीक केले, सिक्रेट कॉफी रेसिपी (Starbucks Secret Coffee Recipe) लीक केल्या, ज्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.


'स्टारबक्स' कॉफीसाठी जगप्रसिद्ध आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांच्या कॉफीची (Coffee) किंमत खूप जास्त आहे, हे देखील तुम्हाला माहीत असेल. तरीही काही कॉफी प्रेमींना या ब्रँडची कॉफी प्यायला आवडते. तुम्ही कधी 'स्टारबक्स' कॉफी प्यायली असेल, तर तुमच्या मनात कॉफीच्या रेसिपीबाबत (Starbucks Coffee Recipe) प्रश्न निर्माण झाले असतील. कधीतरी तुम्हालाही 'स्टारबक्स' कॉफीमध्ये काय टाकलं जातं हे जाणून घ्यावसं वाटलं असेल, तर आज तुमचीही इच्छा पूर्ण होईल.


स्टारबक्स कॉफीची रेसिपी लीक


त्याचं झालं असं की, स्टारबक्स कंपनीने कामावरुन काढून टाकल्याने स्टारबक्सला धडा शिकवण्यासाठी या कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर विविध कॉफीच्या सिक्रेट रेसिपी उघड केल्या. स्टारबक्स कॉफीची रेसिपी पाहून अनेक नेटकऱ्यांनाही खूप आनंद झाला. ही कॉफी विकत घेण्यासाठी इतके पैसे देण्याऐवजी आता ती घरी बनवता येईल म्हणून अनेकजण खूश झाले. कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर एकाच वेळी अनेक रेसिपींचे फोटो पोस्ट केले, ज्यामध्ये कॉफीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या स्टारबक्स कॉफी बनवण्याची रेसिपी दिली गेली आहे.






याआधीही कॉफी रेसिपी झाल्या लीक


याआधीही स्टारबक्स कॉफीच्या रेसिपी लीक झाल्या आहेत. इंटरनेटवर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या. एका युजरने म्हटलं की, 'स्टारबक्सची गोपनीय माहिती लीक केल्याबद्दल तुम्हाला कायदेशीर नोटीस मिळाल्यास आम्हाला अजिबात आश्चर्य वाटणार नाही.' तर दुसरा एकजण म्हणाला, 'आता स्टारबक्समध्ये जाण्याची गरज नाही.' नोकरीवरून काढून टाकल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्याने कॉफीच्या रेसिपी लीक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत.


हेही वाचा:


World News: भारताच्या 'या' शेजारील देशात फक्त मुस्लिमांनाच मिळतं नागरिकत्व; प्रख्यात पर्यटनस्थळ आहे हा देश