Spider Viral Video : सोशल मीडियावर कधी-कधी असे व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यावर डोळ्यांवर विश्वास ठेवणे थोडे कठीण होऊन जाते. नुकताच असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जे पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. त्याचवेळी हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहे.


पाहा व्हिडीओ : 






व्हिडीओमध्ये एक कोळी दिसत आहे जो बाकीच्या कोळ्यांप्रमाणे खूपच लहान आहे. झाडाच्या सालावर चालताना, यूजर्सना एका खास कारणासाठी हा स्पायडर पाहायला आवडतो. व्हिडीओमध्ये कोळी रंगीबेरंगी पिसे डोक्यावर मोराप्रमाणे पसरवून नाचताना दिसत आहे.


मोरासारखा कोळीचा पिसारा?


सोशल मीडियावर समोर आलेला हा वाईल्ड अॅनिमलिया नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एक सुंदर कोळी दिसत आहे. त्याच्या डोक्यावर बांधलेली खास रचना पाहून प्रत्येकजण थक्क होतो. खरं तर कोळ्याच्या डोक्यावर मोराच्या पिसासारखा रंगीबेरंगी पडदा दिसतो. या पिसाऱ्याला कोळी उचलताना आणि हलवताना दिसतो आहे.


व्हिडीओ व्हायरल होत आहे


सध्या कोळ्याचा हा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओने यूजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. बातमी लिहीपर्यंत या व्हिडीओला सोशल मीडियावर एक लाख 44 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 9 लाईक्स मिळाले आहेत. त्याच वेळी, आश्चर्यचकित यूजर्स सतत कमेंट करताना दिसतात.


महत्वाच्या बातम्या : 


Viral Video : एरव्ही 'शार्क'ला थरथर कापणाऱ्या माणसाने चक्क शार्कसोबतच केला डान्स, अनोखा व्हिडीओ एकदा पाहाच