Viral Video:  शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी करणे, त्यांना अटक होणे अशा बातम्या आपण पाहतो. शासकीय सेवेत होणारा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात येतात. मात्र, सरकारही निष्प्रभ ठरताना दिसत असल्याचे चित्र आहे. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत असून तिकीट काउंटरवरील रेल्वे कर्मचाऱ्याने 500 रुपयांची नोट चक्क 20 रुपयांमध्ये बदलली. प्रवाशाची फसवणूक करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


प्रकरण काय?


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्यानुसार, हा व्हिडिओ दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकातील आहे. एका प्रवाशाने तिकीट काउंटरवर 500 रुपये देत ग्वाल्हेरच्या तिकीटाची मागणी केली. त्याच वेळी तिकीट काउंटरवरील रेल्वे कर्मचाऱ्याने बेमालुमपणे 500 रुपयांची नोट 20 रुपयांच्या नोटेत बदलून घेतली. त्यानंतर प्रवाशाकडून 125 रुपयांची मागणी केली. रेल्वे कर्मचाऱ्याने केलेला हा झोल कॅमेऱ्यात कैद झाला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


Rail Whispers नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. ट्वीटनुसार, हा व्हिडिओ 22 नोव्हेंबर रोजीचा आहे.  काही वृत्तानुसार, एक प्रवाशी ग्वाल्हेरला जाण्यासाठी सुपरफास्ट ट्रेनचे तिकीट खरेदी करण्यासाठी गेला होता. त्याने काउंटरवर 500 रुपयांची नोट दिली. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्याने सफाईदारपणे 500 रुपयांची नोट जमिनीवर टाकली आणि जवळील 20 रुपयांची तिकीट हातात घेतली. 


 






या प्रकरणाची दखल रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतली असून कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. या व्हिडिओवर काही युजर्सने प्रतिक्रिया नोंदवली आहे. एका युजरने म्हटले की, चेन्नईत माझ्यासोबत अनेकदा हा प्रसंग ओढावला आहे. काही रेल्वे कर्मचारी संघटीतपणे गुंडगिरी करत असल्या गैरप्रकारांना प्रोत्साहन देत असल्याची टीका युजर्सकडून करण्यात आली. तर, हा व्हिडिओ रेकॉर्ड केला नसता तर हा प्रकार समोर आला नसता अशीही प्रतिक्रिया एका युजरने दिली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: