Pune Metro : काही दिवसांपूर्वी पुणे मेट्रोच्या (Pune Metro) उद्घाटनाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर सर्वसामान्य पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास सुरू झाला आहे. पण पुणेकरांच्या या मेट्रो प्रवासात काही गमती-जमती घडताना दिसत आहेत. पुणेकरांचे मेट्रोमधील काही मजेशीर व्हिडीओ आणि नेटकऱ्यांनी तयार केलेले मिम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाहूयात पुणे मेट्रोतमधील भन्नाट व्हिडीओ-
आजोबांचा स्वॅग-
गेले काही दिवस एका आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमधील आजोबांच्या स्वॅगनं अनेकांचे लक्ष वेधलं. व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की, एक व्यक्ती त्या आजोबांना विचारतो की मेट्रोमध्ये प्रवास करून कसं वाटत आहे? या प्रश्नावर हे आजोबा उत्तर देतात की, 'मी आत्ताच या मेट्रोमध्ये बसलो आहे. पाच मिनीटांनी या मी सांगतो'
मेट्रोमध्ये फुगडी
लग्नाची वरात असो वा वारी कोणत्याही आनंदाच्या क्षणी फुगडी खेळायचा मोह अनेकांना आवरत नाही. आता एका महिलांच्या ग्रुपनं चक्क मेट्रोमध्ये फुगडी खेळली आहे.
भांडण-
रेल्वे, बस किंवा रिक्षा कोणत्याही वाहनातून प्रवास करताना अनेक जण सिटसाठी भांडण करतात. मेट्रोमध्ये देखील लोकांनी भांडण करायला सुरूवात केली आहे.
मेट्रोमध्ये सायकल-
एका नेटकऱ्यानं सायकल घेऊन मेट्रोमधून प्रवास करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, 'एक व्यक्ती मला म्हणाला, सायकलमुळे मेट्रो घराब होईल, त्याला मी उत्तर दिलं, पण पुणे स्वच्छ राहिल. पुणे मेट्रो ही खूप चांगली संकल्पना आहे. '
हेही वाचा :
- Trending Video : 'मैं झुकेगा नहीं'..नवजात बाळाचा ‘पुष्पा’ स्वॅग, चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले फॅन!
- Viral Video : मोराच्या अंड्याची चोरी करणं पडलं महाग, पुढे असं काही घडलं की...
- Trending : एका फोटोनं आयुष्य बदललं; फुगे विकणारी किस्बू झाली सोशल मीडिया स्टार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha