Psyche Asteroid : अंतराळात (Space) अनेक रहस्यं दडलेली आहेत, ज्यावरून पडदा उठणं बाकी आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने (NASA) अंतराळातील आणखी एक गुपित उघड केलं आहे. नासाने अंतराळातील सोन्याचा साठा शोधला आहे. हा सोन्याचा साठा हाती लागल्या संपूर्ण पृथ्वीवर सर्वजण अब्जाधीश होतील. नासाने (NASA) संपूर्ण पृथ्वीवरील सोन्यापेक्षा लाखो टन अधिक सोनं अवकाशात शोधून काढलं आहे. नासाला 16 Psyche  नावाचा एक लघुग्रह सापडला आहे. हा लघुग्रह सोन्याने बनलेला असल्याचं म्हटलं जात आहे. या लघुग्रहाचं मूल्य सुमारे 10,000 Quadrillion डॉलर असल्याचं सांगितलं जात आहे. या लघुग्रहापासून प्रत्येक व्यक्तीला सुमारे 100 अब्ज डॉलर मिळू शकतात.


अंतराळात कुठे सापडली 'सोन्याची खाण'?


मंगळ आणि गुरू यांच्यामध्ये 16 Psyche नावाचा लघुग्रह आहे. बटाट्याच्या आकाराचा हा लघुग्रह सोने, मौल्यवान धातू प्लॅटिनम, लोखंड आणि निकेलपासून बनलेला असल्याचं सांगितलं जात आहे. सोन्यापासून बनवलेल्या या लघुग्रहाचा व्यास सुमारे 226 किमी आहे. या लघुग्रहावर भरपूर लोह असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. अंतराळ तज्ज्ञांच्या मते, या लघुग्रहावर सध्या असलेल्या लोखंडाची एकूण किंमत सुमारे 8000 क्वॉड्रिलियन पौंड आहे. सोप्या भाषेत 8000 नंतर तुम्हाला आणखी 15 शून्य जोडावे लागतील.


पृथ्वीवरील प्रत्येकाला अब्जाधीश बनवण्याची क्षमता


मंगळ आणि गुरु ग्रहाच्या दरम्यान अंतराळात असलेल्या आणि 16 Psyche म्हणून ओळखल्या मोठ्या लघुग्रहामध्ये पृथ्वीवरील प्रत्येकाला अब्जाधीश बनवण्याची क्षमता असण्याचा दावा करण्यात येत आहे. हा लघुग्रह मौल्यवान धातूंनी इतका समृद्ध आहे की जर तो पकडला गेला आणि पृथ्वीवरील सर्व जणांमध्ये समान प्रमाणात विभागला गेला तर आपल्या ग्रहावरील प्रत्येक व्यक्ती अब्जाधीश होईल.


लोखंड, निकेल आणि सोन्याचे साठे


हा लघुग्रह सुमारे 150 मैल-रुंद म्हणजेच 226 किलोमीटर-रुंद आकाराचा ग्रह आहे. फोर्ब्सच्या मते, यामध्ये सुमारे 10,000 डॉलर किमतीचे Quadrillion किमतीचे लोखंड, निकेल आणि सोनं असू शकतं. ही एक फार मोठी रक्कम आहे. शास्त्रज्ञ या लघुग्रहाचा पृथ्वीच्या विरूद्ध त्याच्या रचनेची आणखी तुलना करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नासाने खास Psyche मिशन सुरु असून या लघुग्रहाबाबत अधिक शोध सुरु आहे.


प्रत्येक व्यक्तीकडे असतील इतके कोटी रुपये?


मीडिया रिपोर्टनुसार, जर हा लघुग्रह किंवा त्यावरील धातू पृथ्वीवर आणण्यात, ते विकण्यात किंवा वापरण्यात यशस्वी झाल्यास पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला सुमारे 9621 कोटी रुपये मिळू शकतील. विशेष म्हणजे तज्ज्ञांनी ही किंमत केवळ त्या लघुग्रहात असलेल्या लोहाची सांगितली आहे. त्यावरील सोने आणि प्लॅटिनमची किंमत अद्याप मोजली गेलेली नाही. तज्ज्ञांच्या मते, या लघुग्रहावरील सोन्याचं प्रमाण जगभरातील सोन्याहून जास्त ठरू शकतं.


संबंधित इतर बातम्या :


ब्रह्मांडातील आणखी एक गूढ! अनोख्या 'पल्सर' ताऱ्याचा शोध, यात नेमकं खास काय? जाणून घ्या...