Viral Video : सोशल मीडियावर (viral video) वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसतात, तर काही व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क होतात. लग्न सोहळ्यातील देखील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेक वेळा लग्नामध्ये डीजेला बोलावलं जातं. साऊंडवर लावण्यात आलेल्या गाण्यावर उपस्थित असणारे सगळे लोक डान्स करतात. अनेक वेळा या साऊंडच्या आवाजाचा त्रास इतर लोकांना होते. त्यामुळे लोक पोलिसांकडे तक्रार करतात. अशा वेळी पोलीस लग्नसोहळ्यात जाऊन साऊंड बंद करायला लावतात. पण अमेरिकेतील एका पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 


अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील एका लग्नसोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मनप्रीत तूर यांच्या घरी लग्नसोहळा सुरू होता. या वेळी विवाह सोहळ्यामध्ये लावण्यात आलेल्या साऊंडचा आजूबाजूच्या लोकांना त्रास झाला. त्यामुळे लोकांनी पोलीसांना बोलावलं. पण साऊंड बंद करायला आलेल्या पोलिसांना देखील मनप्रीत तूरच्या कुटुंबीयांनी डान्स करायला लावला.  व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कॅलिफोर्नियामधील पोलीस हा पंजाबी गाण्यावर डान्स करत आहे. 






व्हायरल झालेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. आत्तापर्यंत अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक आणि कमेंट केलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :