Peru, US : आपल्या पृथ्वीवरील (Earth) जगापेक्षाही वेगळं असं जग आहे, असं म्हटलं जातं. अवकाशातील (Space) इतर ग्रहांवर परग्रहावासीयांची म्हणजेच एलियन्सची (Alien) वस्ती आहे, असंही सांगितलं जातं. जगभरातील शास्त्रज्ञांकडून यावर संशोधन सुरु आहे. त्याबाबत आतापर्यंत अनेक दावे करण्यात आले आहेत. आता एलियन्सने मानवावर हल्ला केल्याचा दावा करण्यात येत आहे. लॅटिन अमेरिकेतील पेरूमध्ये परग्रहावरील लोकांनी हल्ला केल्याचा दावा तेथील स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
एलियन्सचा माणसांवर हल्ला?
पेरूतील स्थानिकांनी तक्रार केली की, हिरव्या रंगाच्या 7 फूट उंचीच्या रहस्यमय प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला, त्याचे डोळो पिवळ्या रंगाचे होते. हे हल्लेखोर माणूस नसून एलियन आहेत, असा दावाही स्थानिक करत आहेत इतकंच नाही तर, या एलियन्सवर बंदुकीच्या गोळ्यांचाही प्रभाव पडत नसल्याचं म्हटलं जात आहे. काही लोकांनी सांगितलं की, त्यांच्यावर दोनदा गोळी झाडली, पण तो त्याला काही झालं नाही, तर तो गायब झाला.
बंदुकीच्या गोळ्यांचाही परिणाम नाही
पेरूमधील एका गावातील लोकांनी एक धक्कादायक दावा केला आहे. सात फूट उंच एलियन्सने त्यांच्यावर हल्ला केल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. शिवाय, येथील नेत्यांनी म्हटलं आहे या विचित्र जीवांवर गोळ्यांचा काहीही परिणाम होत नव्हता.
एलियनचा हल्ला की खाणकाम माफियांचा हात?
एलियन्सच्या हल्ल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे आहे. दरम्यान, याचा संबंध अवैध खाणकामाशी जोडला जात आहे. या प्रकरणी तपास करत असलेल्या पेरूच्या राष्ट्रीय अभियोक्ता कार्यालयाने सांगितलं की, सोन्याशी संबंधित माफिया "एलियन" या हल्ल्यांसाठी जबाबदार आहेत. दरम्यान, या संबंधित अधिक तपास सुरु आहे.
नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न?
सरकारी वकिलांनी याबाबत सांगितलं की, सोने माफिया दहशत पसरवून पेरूमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक लोकांना त्यांच्या घरात कोंडून ठेवण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे या एलियन हल्ल्यांचं सोंग रचल्याचं येत असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी पुढे सांगितलं की, बेकायदेशीर खाण माफियांनी पेरूमधील नानय नदीच्या आसपासच्या जंगलात सोने शोधण्यासाठी हा हल्ला करण्यात आला.
सोन्याच्या शोधासाठी 'ही' मेहनत
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पेरूमधील नानाय नदीच्या आसपासच्या जंगलात सोनं असल्याचं बोललं जातं. गुन्हेगार या सोन्याच्या शोधात आहेत. त्यामुळे त्यांनी नागरिकांना घाबरवण्यासाठी हा हल्ला प्लॅन केला. पोलिसांनी स्पष्ट केलं की, बेकायदेशीर खाण कार्टेलद्वारे जेटपॅकचा वापर पेरूमधील नानाय नदीच्या आसपासच्या जंगलात खोलवर सोने शोधण्यासाठी केला गेला आहे.