Drnking Habits: भारतात एक म्हण आहे की, ज्याला दारू आणि जुगाराचं व्यसन लागतं तो केवळ स्वतःचाच नाही, तर संपूर्ण कुटुंबाचा नाश करतो. आज त्याच दारूच्‍या व्यसनाबद्दल (Alcohol Addiction) जाणून घेऊया. त्‍यासोबतच एखाद्या व्‍यक्‍तीला दारूचं (Alcohol) व्‍यसन कसं होतं आणि जर एखादी व्‍यक्‍ती सात दिवस सतत मद्यपान करत असेल तर त्‍याला दारूचं व्यसन लागू शकतं का? हे देखील जाणून घेऊया.


कसं लागतं दारुचं व्यसन?


तज्ज्ञांच्या मते, दारुचं व्यसन हे वर्षानुवर्षे चालत आलेली वाईट परंपरा आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला दारूचं व्यसन लागतं तेव्हा ते तीन टप्प्यात होतं. यामध्ये तुम्ही पहिल्या टप्प्याला प्रारंभिक टप्पा म्हणू शकता. या अवस्थेत तुम्ही दारू पीत असता, पण तुम्हाला त्याचे व्यसन लागलं आहे हे लक्षात येत नाही. या दरम्यान दारू पिणारी व्यक्ती खूप मद्यपान करते, पण नियंत्रण गमावत नाही.


अशा स्थितीत दारु पिणाऱ्याला तो दारू पिण्यात प्रो बनला आहे, असं त्याला वाटायला लागतं. पण तिथेच तो सर्वात मोठी चूक करतो आणि मद्यपानावर नियंत्रण ठेवू शकत नाही.


व्यसनाचा मधला टप्पा आणि शेवटचा टप्पा


मधल्या टप्प्यात तुम्हाला तुमच्या शरीरात काही अंतर्गत बदल जाणवतील. यासोबतच समाजातही तुमचं वागणं किंवा लोकांसोबत असलेली तुमची वागणूक बदलत असल्याचं तुम्हाला जाणवेल.


व्यसनाच्या शेवटच्या टप्प्यातील लोक दारू पिऊन संपूर्ण नियंत्रण गमावतात. या टप्प्यात तुम्ही दारुशिवाय जगूच शकत नाही. यासोबतच व्यसनाच्या अंतिम टप्प्यात विविध आजारांनी तुम्हाला घेरलेलं असतं. या स्थितीत तुमच्या जीवनाचा अपव्यय होऊ लागतो आणि यामध्ये तुमचं आर्थिक आणि शारीरिक नुकसान देखील होतं.


सात दिवस दारु प्यायल्यास व्यसन लागतं का?


सात दिवस सतत मद्यपान केल्याने तुम्हाला त्याचं व्यसन लागू शकतं का? यावर बोलायचं झालं तर याबाबत कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. पण हे नक्की आहे की, तुम्ही इतके दिवस सतत दारू प्यायला आणि दारुचं प्रमाण जास्त असेल तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. दारूचं व्यसन सोडायचं असेल तर त्याचे तोटे आणि दुष्परिणाम वेळीच समजून घेतले पाहिजेत. हे देखील समजून घेणं आवश्यक आहे की, दारू सोडल्याने मानसिक आरोग्य (Mental Health) सुधारतं. दारू सोडल्याने ताणतणाव कमी होतो आणि मूड सुधारतो.


हेही वाचा:


Consumption Of Alcohol : सावधान ! दारूचे अतिसेवन ठरू शकते तुमच्या मेंदूला घातक; जाणून घ्या