Trending Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतं. काही व्हिडीओ आपलं मन प्रसन्न करतात, पण काही व्हिडीओवर मात्र नेटकरी संताप व्यक्त करतात. सध्या असाच एक मॅगीचा (Maggie) व्हिडीओ व्हायरल होत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मॅगी आणि संताप हे कसं शक्य आहे. मॅगीतर अनेकांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र एका पठ्ठ्याने मॅगीवर विचित्र प्रयोग केला आहे. यावर नेटकऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
अनेक जण अन्नपदार्थांवर नवनवीन प्रयोग करत वेगळा आणि नवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतात. सध्या असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडी ओमध्ये एका व्यक्तीने अगदी दोन मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या मॅगीवर विचित्र प्रयोग केला आहे. या व्यक्तीने चक्क केक आणि मॅगी यांची सांगड घातली आहे. होय, तुम्ही वाचताय ते खरं आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने चक्क पेस्ट्री मॅगी बनवली आहे. ही पेस्ट्री मॅगी बनवताना त्याने आधी एका पॅनमध्ये तेल टाकून त्यावर कांदा आणि मिरची घातली. त्यानंतर यामध्ये पेस्ट्री घातली. पुढे या पॅनमध्ये पाणी टाकून पेस्ट्रीसह पाणी उकळवलं. यानंतर यामध्ये मॅगी आणि मसाला घातला. अशा प्रकारे ही विचित्र पेस्ट्री मॅगी तयार करण्यात आली आहे.
मॅगी प्रेमींचा संताप
मॅगीवर असा विचित्र प्रयोग करण्यात आल्याने मॅगी प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. याआधीही मॅगीसोबत अनेक विचित्र प्रयोग करण्यात आले आहेत. याआधी कोको कोला मॅगी, विमल मॅगी बनवण्यात आली आहे. आता या पेस्ट्री मॅगीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
संबंधित इतर बातम्या