Nobel Prize 2023: नोबेल पुरस्कार हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रातल्या कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षी पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं जाते. नोबेल पुरस्कार (Nobel Prize) विजेत्यांना सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्रासह मोठी रक्कम दिली जाते.


दरम्यान, नोबेलसाठी अर्ज कसा करायचा? आणि कोणीही या पुरस्कारासाठी स्वतःला नामांकित करू शकतो का? हे जाणून घेऊया.


नोबेल पुरस्काराचा इतिहास


विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी नोबेल पुरस्काराचं वितरण केलं जातं. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका संस्थेला दान केला होता. त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार देण्यात येतो. पहिला नोबेल शांती पुरस्कार इ.स. 1901 मध्ये देण्यात आला होता.


नोबेल संबंधित नियम


नोबेल पारितोषिक सहसा दोन किंवा तीन लोकांना संयुक्तपणे दिले जाते. एकाच श्रेणीतील जास्तीत जास्त तीन जणांना हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. नोबेल शांतता पुरस्काराच्या बाबतीत, हा प्रतिष्ठेचा पुरस्कार कोणत्याही संस्थेला दिला जाऊ शकतो. याशिवाय हा पुरस्कार कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर दिला जात नाही. एकदा नोबेल मिळाले की ते परत घेता येत नाही. तसेच नोबेल पुरस्कार देणाऱ्या संस्थेविरुद्ध अपील करता येणार नाही.


स्वतः अर्ज करता येत नाही


आता प्रश्न पडतो की, नोबेल पुरस्कारासाठी अर्ज कसा दिला जाऊ शकतो? तर यासाठी तुम्ही स्वतः अर्ज करू शकत नाही. नामनिर्देशन केवळ निमंत्रणाद्वारे पाठवलं जाते. ज्यामध्ये सर्व निकष पूर्ण करावे लागतात. नोबेल पारितोषिकांच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ज्यांना नामांकन मिळाले आहे त्यांची नावे 50 वर्षांपासून उघड केली जात नाहीत.


निवड कोण करते?


नोबेल पुरस्काराची निवड करण्यासाठी एक समिती असते. जी पुरस्कार विजेत्यांची निवड करते. नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकनासाठी पात्र असलेले कोणीही व्यक्ती पाठवू शकतात.


या देशांकडे सर्वाधिक नोबेल पारितोषिक


अमेरिका आणि ब्रिटनकडे सर्वाधिक नोबेल पारितोषिक आहे. भारताबद्दल बोलायचं झालं तर, आतापर्यंत एकूण 9 भारतीयांना नोबेल पारितोषिक मिळालं आहे. ज्यामध्ये रवींद्रनाथ टागोर, मदर तेरेसा आणि कैलाश सत्यार्थी यांच्या नावांचा समावेश आहे.


हेही वाचा:


Medicine Nobel Prize 2023 : वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन यंदाचे मानकरी