No Trouser Tube Ride : सध्या सोशल मीडियावर (Social Media) काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये महिला आणि पुरुष पँटविना फिरताना दिसत आहेत. हे फोटो घरातील नाही, तर लंडन शहरातील आहेत. लंडन शहराच्या रस्त्यांवर महिला आणि पुरुष पँटविना फिरताना दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे फोटो व्हायरल होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे या फोटोंमध्ये लोकांनी पँट घातलेली नाही. या फोटोमध्ये अनेक महिला आणि पुरुष दिसत आहेत ज्यापैकी कोणीही पँट घातलेली नाही. महिला आणि पुरुष विना पँट मेट्रोतून प्रवास करत असल्याचे व्हायरल फोटोंमध्ये दिसत आहे.
आता तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की, हे लोक लंडनमध्ये पँटशिवाय का फिरत आहेत आणि यावर कुणी आक्षेप कसा घेतला नाही. फोटोंमध्ये प्रत्येकजण आपल्या अंडरवेअरमध्ये दिसत आहे आणि त्यावर जॅकेट किंवा टी-शर्ट घालून फिरत आहे. जाणून घ्या की हे लोक असे का फिरत आहे आणि पँट न घालण्याचे कारण काय आहे.
असं आहे लंडनमधील चित्र
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये तुम्हाला हे दिसेल की, मेट्रोतून विना पँट फिरताना दिसत आहेत. बरं पँटशिवाय फिरणाऱ्यांची संख्याही कमी नाही आणि मोठ्या संख्येने लोक पँट न घालता फिरत आहेत. या लोकांमध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे.
हे करण्यामागचं कारण काय?
रिपोर्ट्सनुसार, ही लंडनमधील ही एक परंपरा आहे. दरवर्षी जानेवारीमध्ये ही परंपरा जपली जाते. लंडनमधील जानेवारीत एक दिवस लोक पँट न घालता मेट्रोने प्रवास करतात. या परंपरेला 'नो ट्राउजर ट्यूब राइड' (No Trouser Tube Ride) असे नाव आहे.
या ट्रेंडची सुरुवात सुमारे 20 वर्षांपूर्वी न्यूयॉर्क, अमेरिकेत झाली होती. त्याची सुरुवात कॉमिक परफॉर्मन्स ग्रुपने केली होती. त्यावेळी ही परंपरा विनोद म्हणून सुरू करण्यात आली होती आणि त्या काळात फक्त सात जणांनी ही परंपरा सुरू केली होती. त्यावेळी सात जण मेट्रो स्टेशनवर चढले आणि त्यांनी पँट घातली नव्हती. तेव्हापासून हा ट्रेंड जगातील इतर अनेक देशांमध्येही सुरू झाला आणि लंडनमध्येही सुरु झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या
Aconite Flower : सौंदर्याच्या मोहात पडू नका! अतिशय विषारी आहे 'हे' फूल, मृत्यूचाही धोका