Dangerous Aconite Flower : घरात कोणतही शुभकार्य असो, त्यासाठी फुलांची (Flower) सजावट केली जाते. विविध रंगीबेरंगी सुवासिक फुले कार्यक्रमाची शोभा वाढवतात. रंगीत फुले पाहून मनही उत्साही होते. अनेक फुलांपासून औषधेही बनवली जातात. परंतु सुंदर दिसणारी ही सर्वच फुले चांगली असतात, असे नाही. काही फुले अतिशय विषारी असतात. या फुलांच्या सुंदर दिसण्याचा मोहात पडू नका कारण, ही फूलं खूप विषारी असतात. अशाच एका विषारी फुलाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे विषारी फूल प्राणघातक आहे.


'हे' विषारी फूल कोणते?


हिमालय पर्वतावर एक अतिशय विषारी फूल आढळते. हिमालय पर्वताच्या मैदानात सुमारे 10 हजार फूट उंचीवर एक अत्यंत विषारी फूल आढळते, ज्याला इंग्रजीमध्ये ॲकोनाइट (Aconite) असं म्हटलं जाते. या फुलाला हिंदीमध्ये मीथा विष, संस्कृतमध्ये वत्सनाभ अशी नावे आहेत. ॲकोनाइट हे फूल हिमालय पर्वताच्या शिखरावर उगवते. हे फूल इतकं घातक आहे की त्याचा सुगंधही तुम्हाला बेशुद्ध करु शकतो. मात्र, त्यातून अनेक प्रकारची औषधेही बनवली जातात. हे कोणते फूल आहे ते जाणून घेऊया.


हिमालय पर्वतावर आढळते विषारी फूल


हिमालय पर्वतावर आयुर्वेदिक औषधी वनस्पती सापडतात. या औषधी वनस्पती जगात इतर कुठेही आढळत नाहीत. पण याच ठिकाणी अतिशय विषारी ॲकोनाईटसारख्या काही विषारी वनस्पतीही आढळतात. ॲकोनाईट ही वनस्पती अतिशय विषारी असून यामुळे प्राण गमावण्याचा धोका असतो. 


ॲकोनाईटचा औषधी गुणधर्म


आयुर्वेदानुसार, मधुमेह आणि विशेषतः अर्धांगवायू सारख्या आजार बरे करण्यासाठी ॲकोनाईट एक अद्भुत आणि चमत्कारिक औषध आहे, पण त्यासाठी याचा वापर करण्याची एका विशिष्ट पद्धतीनेच करावा लागतो. अन्याथा याचा गंभीर दुष्परिणाम भोगावा लागू शकतो. ॲकोनाईट वनस्पती अतिशय धोकादायक असून त्याच्या आजूबाजूला दुसरी कोणतीही वनस्पती किंवा गवतही उगवत नाही.


प्राण्याने खाल्ल्यास होतो मृत्यू


प्राण्याने ॲकोनाईट फूल किंवा वनस्पतीची पाने खाल्ली तर, त्या प्राण्याचा मृत्यूही होतो, असे म्हटले जाते. प्रचलित माहितीनुसार या वनस्पतीची पाने खाल्ल्यास प्राणी लगेच मरतो. ही वनस्पती प्राण्यांना स्वतःकडे आकर्षित करते. त्यानंतर प्राण्यांना ते खाण्याची इच्छा होते. पण, हे प्राण्यासाठी प्राणघातक ठरते. हिमालय पर्वतावरील नामिक आणि हिरामणी हिमनद्याजवळ ॲकोनाईट ही वनस्पती आढळते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात या झाडावर निळ्या रंगाची फुले येतात.


ॲकोनाईटची इतर नावे आणि काही खास गोष्टी


वनस्पतिशास्त्रानुसार, ॲकोनाईटला विषाची राणी म्हणजे क्वीन ऑफ पॉयजन, डेव्हिल्स हेल्मेट, ब्लू रॉकेट इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते. ही वनस्पती एक अँजिओस्पर्मिक वनस्पती आहे, म्हणजे एक वनस्पती ज्यामध्ये मूळ, कांड, पाने, फळे, फूल, बियाणे आणि आवरण देखील आढळते. ही वनस्पती रेनंकुलेसी (Ranunculacaceae) प्रजातीतील आहे.