Moulay Ismail Ibn Sharif : एक सुलतान ज्याची 1000 हून अधिक मुलं होती. हो तुम्ही वाचताय ते खरं आहे. एक सुलतान ज्याची 1171 मुलं होती. मोरोक्कोचा सुलतान मौले इस्माईल (Sultan Ismail Ibn Sharif) या राजाला 1,171 मुले होती. फ्रेंच राजदूत डॉमिनिक बुस्नॉट यांनी 1704 मध्ये त्यांच्या पुस्तकात ही बाब उघड केली. सुलतान मौले इस्माईल उर्फ सुलतान मौले इस्माईल इब्न शरीफ या राजाला 'द ब्लड थर्स्टी' या नावानंही ओळखलं जातं. मोरोक्कोच्या या सुलतानला 880 मुलं असल्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही सिद्ध केलं होतं. 


सुलतान मौलेचं मोरोक्कोवर 55 वर्षे राज्य


ही कथा आहे एका क्रूर आणि निर्दयी सुलतान मौले इस्माईलची. या सुलतानने मोरोक्कोवर 55 वर्षे राज्य केलं. मोरोक्कोच्या इतिहासात दुसरा कोणताही सुलतान इतक्या अधिक वेळ राज्य करू शकला नाही. सुलतान मौले इस्माईलने 1672 ते 1727 पर्यंत म्हणजे 55 वर्षे मोरोक्कोवर राज्य केलं. या राजाच्या क्रूरतेच्या अनेक कहाण्या इतिहासात नोंद आहेत. जगात सर्वाधिक मुलांना जन्म देणारे वडील म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही सुलतान मौले इस्माईलच्या नावाची नोंद झाली आहे.


कोण होता सुलतान मौले इस्माईल?


मौले इस्माईलचा जन्म मोरोक्कोमधील सिजिलमासा या प्राचीन शहरात 1645 च्या सुमारास झाला. तो अलौईट राजघराण्याचा दुसरा सुलतान होता. मौलेना राज्य करण्यासाठी एक राज्य देण्यात आले होते, मात्र हे राज्य आंतरजातीय युद्धे आणि सिंहासनाच्या उत्तराधिकाराच्या युद्धांमुळे कमकुवत झालं होतं. पण सुलतान मौलेने हे राज्य सुरळीत चालवलं. मोरोक्कोचे फ्रान्स, ग्रेट ब्रिटन आणि स्पेन यांसारख्या प्रमुख शक्तींशी महत्त्वाचे राजनैतिक संबंध होते. 


30 हजारांहून अधिक लोकांचा छळ करून हत्या


मोरोक्कोच्या फेझ शहरात 400 बंडखोरांचा शिरच्छेद करून त्याने आपली सत्ता सुरू केल्याचे सांगितले जाते. या बंडखोरांचे छिन्नविछिन्न टोक फैजमध्येच भिंतीवर एका रेषेत टांगले होते. सुलतान मौले इस्माईलने त्याच्या 55 वर्षांच्या कारकिर्दीत 30 हजारांहून अधिक लोकांचा छळ करून हत्या केली. 2017 मध्ये, फ्रेंच टीव्ही कार्यक्रम 'सिक्रेट्स ऑफ हिस्ट्री' मध्ये 'मौले इस्माईल: सन किंग ऑफ अ थाउजंड अँड वन नाईट्स' वर एक भाग प्रदर्शित करण्यात आला. यातील वर्णनानुसार, सरासरी उंचीचा पण देखणा असलेला मौले नेहमी हिरवे आणि पांढरे कपडे परिधान करत असे. पण रागात किंवा युद्धाच्या वेळी तो पिवळे कपडे परिधान करायचा.


मुलाला दिली 'ही' गंभीर शिक्षा


सुलतान मौले इस्माईल उत्तम घोडेस्वारही होता. त्याच्या नोकरांनी जर त्याला घोड्यावर स्वार होण्यास मदत केली तर तो विनाकारण त्यांचा शिरच्छेद करायचा. एवढंच नाही तर त्याच्या विरोधात जाण्याचे धाडस केल्याबद्दल शिक्षा म्हणून त्याचे त्याच्याच एका मुलाचा डावा हात आणि उजवा पायही कापला होता.


चार बायका आणि 500 हून अधिक 'रखेल'


सुलतान मौले इस्माईलच्या क्रूरतेसोबतच त्याच्या प्रेमळ आणि रंगीन स्वभावाच्या चर्चा होत्या. सुलतान मौलेला चार बायका होत्या आणि त्याच्या हरममध्ये 500 हून अधिक 'रखेल' होत्या. पण तो जितका प्रेमळ होता तितकाच तो क्रूरही होता असंही सांगितलं जातं. कोणत्याही आदिवासी जमातीनं युद्धात त्याच्यापुढे गुडघे टेकले तर त्या जमातीचा पुढारी त्याला त्याची सर्वात सुंदर मुलगी भेट द्यायचा. त्यामुळे सुलतानच्या हरममध्ये स्त्रियांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती.


सुलतान मौले इस्माईलला 1171 मुलं


गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, सुलतान मौलेला 888 मुले असल्याचा पुरावा आहे. दरम्यान, 1704 पर्यंत मोरोक्कोला वारंवार प्रवास करणारे फ्रेंच राजदूत डॉमिनिक बस्नॉट यांच्या अहवालानुसार, सुलतानला 1171 मुलं होती. तेव्हा मौले 57 वर्षांचा होता आणि तो 32 वर्षे मोरोक्कोवर राज्य करत होता.


हरममध्ये स्त्रियांची कमतरता नव्हती


अनेक शास्त्रज्ञांचे मते, मौलेला इतकी मुलं असणं शक्य आहे. सर्व प्रकारच्या संशोधनातून असे दिसून आलं की, जर मौलेने 32 वर्षे दररोज महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवला असेल तर त्याला 1171 मुलं असू शकतात. कारण त्याच्या हरममध्ये स्त्रियांची कमतरता नव्हती. दरम्यान, असं म्हटलं जातं की, त्याच्या राज्यातील एखाद्या स्त्रीचे पतीशिवाय इतर पुरुषाशी संबंध असल्याचं आढळून आलं तर तो त्या महिलेचं स्तन कापायचा, दात काढायचा आणि तिला फाशी देत असे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Most Poisonous Ruler : जगातील सर्वात विषारी शासक, दररोज जेवणातून करायचा विषप्राशन, राजा मोहम्मद बगदाच्या शरीरावर बसलेली माशीही जिवंत रहात नसे, 'ही' रंजक कहाणी माहितीय?