Riya, self-proclaimed social media influencer : सोशल मीडियाच्या युगात (social media, where) जिथे ट्रेंड आणि आव्हाने प्रकाशाच्या वेगाने विकसित होत आहेत. लोक सतत चर्चेत राहण्यासाठी आणि फाॅलोअर्स मिळविण्याचे अनोखे मार्ग शोधत असतात. प्रेमाच्या शोधातही असंच अभिनव वळण लागलं आहे यात आश्चर्य नाही.






रिया नावाच्या (Riya, self-proclaimed social media influencer) स्वयं-घोषित सोशल मीडिया स्टारची व्हायरल झालेली वैवाहिक जाहिरात (matrimonial ad)  शेअर करून तिच्या जीवन साथीदार शोध एका नवीन स्तरावर नेला आहे. या आगळ्यावेगळ्या जाहिरातीची चांगलीच चर्चा रंगली आहे. 



"कॅमेरा लाजाळू" नसलेल्या जोडीदाराच्या शोधात


रियाच्या वैवाहिक जाहिरातीने सोशल मीडियात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण तिने तिच्या संभाव्य वरासाठी अटी शर्तींची माळच लावून टाकली आहे. तिने जाहिरातीमध्ये स्पष्ट केलं आहे की, ती "कॅमेरा लाजाळू" नसलेल्या जोडीदाराच्या शोधात आहे आणि तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिलेशनशिप व्हिडिओ तिच्यासोबत तयार करेल, पण हे एवढेचं नाही. 



"प्रीमियर प्रो" वापरण्यात कुशल असावा


इच्छूक होण्यापूर्वी रियाने "अमेझॉन मिनीटीव्हीचा हाफ लव्ह हाफ अरेंज्ड" पाहावा अशी विनंती केली आहे. शिवाय, तिने त्यांच्या सोशल मीडिया सामग्री संपादित करण्यासाठी "प्रीमियर प्रो" वापरण्यात कुशल असावा असंही नमूद केलं आहे. 



या वैवाहिक जाहिरातीने नेटकऱ्यांचं पटकन लक्ष वेधून घेतलं आहे. रियाच्या अटी शर्तीचा विचार करता जीवन साथीदार शोधण्यापेक्षा व्हिडिओ एडिटर किंवा कॅम्पेन मॅनेजर नियुक्त करण्यासाठी अधिक योग्य आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे. 



इतर महत्वाच्या बातम्या