Banarasi BIkini Wedding Ceremony : उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये नववधूने 'बनारसी बिकिनी' परिधान करून लग्न केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर लग्नाचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की लखनौमधील एका वधूने 'पितृसत्ताक' लग्नात बनारसी साडी परिधान करण्याचा पारंपरिक नियम मोडून बिकिनी घालून लग्न केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एक तरुणी पिवळ्या रंगाची बिकिनी आणि बांगड्या घालून वरासमोर लग्नमंडपात उभी असलेली दिसत आहे.
फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर 'वधूच्या वागण्यावर टीका केली आणि खिल्ली उडवली. मात्र, व्हायरल फोटो फेक असल्याचे समोर आलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेकग्निशन सॉफ्टवेअर वापरून तो फोटो तयार केल्याचे 'बूम'ने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये समोर आलं आहे. फेसबुकवर एक छायाचित्र पोस्ट करताना एका यूजरने लिहिले की, "लग्नाचा हंगाम सुरू आहे आणि व्हायरल होण्याची स्पर्धा सुरू आहे.
या फोटोचा स्रोत शोधण्यासाठी, BOOM ने प्रथम Google वर उलटा शोध घेतला. 18 नोव्हेंबर 2024 रोजी देसी ॲडल्ट फ्यूजन नावाच्या सब-रेडडिटवर पोस्ट केले होते. इमेज जिथे पोस्ट केली गेली होती त्या सब-रेडडिटमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की सब-रेडिटचा उद्देश AI वापरून तयार केलेल्या देशी संस्कृतीच्या प्रतिमा दाखवणे आहे.
इतर महत्वाच्या बातम्या