Manager Employee WhatsApp Chat Viral : आजकाल सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आता तुम्हीच पाहा की इथे एक कर्मचारी आणि त्याच्या बॉसचे व्हॉट्सॲपचे संभाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बर्‍याच कर्मचार्‍यांसाठी (Employee) सर्वात कठीण गोष्ट म्हणजे त्यांच्या बॉस (Boss) किंवा मॅनेजरकडून रजा मंजूर करणे. कारण कर्मचाऱ्याचा रजेचा अर्ज पाहताच अनेक बॉसना डोकेदुखी होते, पण जेव्हा एका कर्मचाऱ्याने सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून अवघ्या जगाला सांगितले की, त्याच्या मॅनेजरने तिची 10 दिवसांची रजा अवघ्या 2 मिनिटांत मंजूर केली, तेव्हा नेटकरीही आश्चर्यचकित झाले. तर काही यूजर्सनी कर्मचाऱ्याशी चॅट करताना मॅनेजरने डिलीट केलेल्या मेसेजबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. नेमकं काय घडलं? जाणून घ्या



व्हॉट्सॲप चॅटवर काय झालं?



प्रत्येक ऑफिसचे वर्क कल्चर वेगळे असते. कामाच्या पद्धतीशिवाय कामाचा ताणही तितकाच जास्त असतो. दरम्यान, रजा मागणे सोपे नसते. तुम्ही जरी रजा मागितली तरी काही वेळा तुमचा रजेचा अर्ज फेटाळला जातो, पण जर तुमच्या बॉसने तुमची 10 दिवसांची रजा फक्त 2 मिनिटांत मंजूर केली तर काय होईल? याची कल्पना करा, एवढेच नाही तर हे ' have fun'असा मेसेज पाठवला तरी काही लोकांसाठी ते नक्कीच सोनेरी स्वप्नापेक्षा कमी नसेल. अलिकडे अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.  या व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये, कर्मचाऱ्याने बॉसला व्हॉट्सॲपवर लिहिले - "हाय पूजा, मी या महिन्याच्या 15 तारखेच्या आसपास सहलीची योजना आखत आहे. मला 15 ते 25 तारखेपर्यंत सुट्टी घेणे शक्य होईल का? यावर बॉसने उत्तर दिले - होय, आणि असेही लिहिले की मजा करा. मात्र, त्यानंतर बॉसने दोन मेसेज डिलीटही केले. आता प्रश्न उपस्थित होत आहे की मॅनेजरने असे काय लिहिले? की तिला मेसेज डिलीट करावा लागला.


 




 



10 दिवसांची रजा 2 मिनिटात मंजूर


13 सप्टेंबर रोजी व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉट पोस्ट करताना, X यूजरने सांगितले की, मॅनेजरने माझी 10 दिवसांची रजा 2 मिनिटांत मंजूर केली. त्याच्या या पोस्टला 5 लाख 57 हजारांहून अधिक व्ह्यूज, साडेचार हजारांहून अधिक लाईक्स आणि सर्व यूजर्सच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. यावर एका व्यक्तीने लिहिले - तो एक उत्तम मॅनेजर आहे. तर दुसरा म्हणाला - प्रत्येकाला असे व्यवस्थापक मिळावेत अशी मी प्रार्थना करतो. काहींनी सांगितले की, खरी गोष्ट डिलीट केलेल्या मेसेजमध्ये आहे. तर बर्‍याच यूजर्सनी संबंधित ऑफिसचं मॅनेजमेंट उत्कृष्ट असल्याचे सांगितले.


 




 






 


हेही वाचा:


Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत स्लीपर ट्रेन बनवून तयार; लवकरच होणार लाँच, पाहा लूक