Propose Video Goes Viral : प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमच आमच सेम असतं असे आपण कित्येकदा ऐकले आहे. प्रेमाला (Love) कोणत्याच वयाची गरज नसते. तरूणपणात जसे अनेक जण प्रेमात पडतात तसेत म्हातारपणी ही अनेक वयोवृद्ध प्रेमात पडतात. अशातच सोशल मिडीयावर एक व्हिडीओ (Video) चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात एक वृद्ध डाॅक्टरने त्यांच्या हायस्कुल क्रशला गुडघ्यावर बसून प्रपोज केले आहे. तब्बल 60 वर्षानंतर त्यांनी आपले प्रेम व्यक्त केले आहे. 


ही प्रेम कहाणी आहे थॉमस मैकमीकिनआणि नॅन्सी गैम्बेलची. 78 वर्षांच्या थॉमस यांनी त्यांच्या हायस्कुल मध्ये असणाऱ्या नॅन्सी गैम्बेल हिला प्रपोज केलं. नॅन्सी त्यांची क्रश होती. 60 वर्षानंतर ते दोघे पुन्हा एकत्र आलेत. हायस्कुल मध्ये शिकत असताना थॉमस यांना नॅन्सी फार आवडायची. नंतर त्या दोघांनी वेगवेगळ्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला, अधूनमधून ते भेटायचे आणि डेटवर देखील जायचे. कॉलेज मध्ये असताना त्यांनी एकमेकांना डेट सुद्धा केलं, पार्टीलाही जायचे. पण नंतर काही वर्षांनी त्यांचे मार्ग वेगळे झाले आणि ते दोघे आपापल्या आयुष्यात पुढे जात असताना त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न केले. मात्र ते एकमेकांना विसरू शकले नव्हते. आज जेव्हा ते 60 वर्षानंतर समोर आले थॉमसने नैन्सीला एकदम हटके प्रपोज केलंय. थॉमसची पत्नी आणि नैन्सीचा पती यांचं निधन झालंय. थॉमसने नैन्सीला एअरपोर्टवर प्रपोज केलं, याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.


काय आहे व्हिडीओमध्ये (What Does Proposal Video Show)


या व्हिडीओमध्ये थॉमस हे त्यांची हायस्कूल क्रश नैन्सीची आतुरतेले वाट पाहत उभे आहेत. काही वेळानंतर नैन्सी एअरपोर्टवर पोहोचते आणि ते दोघे एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात. त्यानंतर थाॅमस  नॅन्सीला एका एअरपोर्टवर असणाऱ्या बाकाकडे घेऊन जातात आणि बसायला लावतात. नंतर अगदी वेळ न दवडत ते लगेच गुडघ्यावर बसून नॅन्सीला प्रपोज करतात आणि त्यांनी लिहून आणलेले प्रेमपत्र वाचतात. त्यावर उत्तर देत नॅन्सी "हो , मला हे प्रपोजल मान्य आहेअसे उत्तर देते." हा व्हिडीओ आता चांगलच व्हायरल होत असून आत्तापर्यंत व्हिडीओला 8 लाख लोकांनी लाईक केले आहे. तर नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाखो कमेंट्स केल्या आहेत. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


Maldives : हनीमूनसाठी जोडप्यांची पहिली पसंत मालदीव, पण येथेच घटस्फोटाचं प्रमाण सर्वाधिक, काय आहे कारण?