Trending Anand Mahindra : सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (M&M Chairman Anand Mahindra) हे त्यांच्या वेगळ्या शैलीतील ट्विटसाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा ते विविध व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत असतात, तर आयुष्य बदलणारे सकारात्मक विचारही शेअर करत असतात. आनंद महिंद्रा त्यांच्या फॉलोअर्ससोबत (Followers) अनेक विषयांवर बोलत असतात आणि त्यांना त्यांच्या खास शैलीत उत्तरही देतात. 


ट्विटरवर एक पोस्ट शेअर
अलीकडेच आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात युनायटेड स्टेट्स (USA) मधील 4 जुलैच्या उत्सवाची छायाचित्रे होती. ज्याला "मॅनहॅटन 4 जुलै स्कायलाइन" असे कॅप्शन दिले होते. त्यांनी मॅनहॅटन येथील उत्सव साजरा करतानाचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला.






"तुम्ही एनआरआय (NRI) आहात का?"
4 जुलै रोजी आनंद महिंद्रा अमेरिकेत होते, ज्यावेळी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. आनंद महिंद्राच्या या पोस्टवर युजर्सच्या अनेक कमेंट्स आल्या, पण एका युजरने आनंद महिंद्रा यांना विचारले, "तुम्ही एनआरआय (NRI) आहात का?" या प्रश्नाला आनंद महिंद्रा यांनी अभिमानाने अतिशय मनोरंजक पद्धतीने उत्तर दिले. त्यांच्या उत्तराने इंटरनेट युझर्सची मने जिंकली आहेत. काय म्हणाले आनंद महिंद्रा?


 


 






आनंद महिंद्रा यांनी दिले योग्य उत्तर


युझरच्या प्रश्नाला उत्तर देताना, आनंद महिंद्रा यांनी लिहिले, "फक्त कुटुंबाला भेटण्यासाठी न्यूयॉर्कला आलो, म्हणून मी एक एचआरआय (HRI) आहे. Heart (always) resident in India, ज्याचे हृदय नेहमी भारतात राहते."  आनंद महिंद्राच्या या उत्तराने यूजर्स खूश झाले आणि ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.


संबंधित बातम्या


Anand Mahindra : अग्निपथविरोधात हिंसक आंदोलन, उद्योजक आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा