Trending News : लग्न हा शब्द ऐकताच सर्वात आधी आपल्या डोळ्यांसमोर दोन व्यक्तींच्या म्हणजेच, वर आणि वधूच्या प्रतिमा समोर येतात. काही अपवाद वगळता तुम्ही प्राण्यांच्या लग्नाच्या बातम्या देखील ऐकल्या असतील. पण आता या यादीत प्राण्यांनंतर आता पक्ष्यांचाही समावेश झाला आहे. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. पण हे सत्य आहे. असाच एक आगळावेगळा विवाह सोहळा मध्य प्रदेशात पार पडला आहे. या ठिकाणी पोपट आणि मैनेचं संपूर्ण रितीरिवाजाप्रमाणे अगदी थाटामाटात लग्न लावण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या पोपट-मैनेच्या मालकांनीच थाटामाटात हे लग्न लावलं आहे. 


लग्नाआधी पत्रिका जुळवल्या 


मध्य प्रदेशातील करेलीजवळील पिपरिया (राकई) नावाच्या गावात हा प्रकार घडला आहे. लग्नाआधी मालकाने पोपट आणि मैनेच्या पत्रिकाही जुळवल्या होत्या. त्यानंतर सर्व रितीरिवाज, परंपरांचे पालन करून पोपट आणि मैनेचं लग्न पार पाडलं. इतकंच नाही तर, लग्नानंतर त्यांची मिरवणूकही काढण्यात आली.


थाटामाटात पार पडला विवाह सोहळा 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, पिपरिया येथे राहणाऱ्या रामस्वरूप या मालकाने मैनेचा सांभाळ केला होता. या मैनेला त्यांनी स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवले. तसेच, त्यांच्या शेजारी राहणाऱ्या बादललाल विश्वकर्मा यांनी पोपट पाळला आहे. या पोपटाचाही सांभाळ बादललाल विश्वकर्मा यांनी आपल्या मुलाप्रमाणे केला. या दोघांनीही पोपट-मैनेचं लग्न करायचं ठरवलं. पण, लग्न ठरवायच्या आधी त्यांनी पोपट आणि मैनेची पत्रिका जुळवली. आणि नंतर रविवारचा शुभ दिवस ठरवून दोन्ही मालकांनी संपूर्ण रितीरिवाजांप्रमाणे लग्न केले. 


सजवलेल्या गाडीत मैनेला घ्यायला आला पोपट


लग्नाच्या दिवशी, बद्दललाल विश्वकर्मा यांनी पोपटाची बॅंडसह थाटामाटात मिरवणूक काढली. ही मिरवणूक घेऊन ते रामस्वरूप यांच्या घरी पोहोचले. मिरवणुकीच्या दरम्यान पोपटाची गाडी अगदी सुसोभित करण्यात आली. त्याचवेळी रामस्वरूपच्या यांच्या घरच्यांनीही वरात्यांचं अगदी रितसर पद्धतीने स्वागत केले.  


महत्त्वाच्या बातम्या : 


बापाने खेळायला मोबाईल दिला, पोरानं मात्र 'गेमच' केला; 6 वर्षाच्या मुलानं दिली तब्बल 80 हजार रुपयांच्या जेवणाची ऑर्डर, सोबत 25 टक्के टीपही