UK Lottery Winner Missing : बहुतेक जण मेहनत करुन स्वत:चं भविष्य ठरवतात. तर, काही जण नशीबावर विश्वास ठेवतात. काही जण एका रात्रीत आपलं नशीब पालटेल या उद्देशाने लॉटरी (Lottery) खरेदी करतात. एक दिवस आपल्याला नशीबाची साथ मिळेल आणि आपण श्रीमंत होऊ असं स्वप्न पाहतात. काहींचं हे स्वप्न आयुष्यभर स्वप्न राहत तर काही मोजक्याच जणांचं हे स्वप्न सत्यात उतरतं. आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्या व्यक्तीला 38 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे, पण महत्त्वाचं म्हणजे हा व्यक्ती अजून बेपत्ता आहे. 


38 कोटी रुपयांची लॉटरी, पण जिंकणारा भाग्यवान विजेता बेपत्ता


ब्रिटनमधील एका भाग्यवान व्यक्तीला ही 38 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. ब्रिटन सरकारच्या राष्ट्रीय लॉटरीने सेट फॉर लॉटरी खेळणाऱ्या ग्राहकांना सरकारने आवाहन केलं आहे की, त्यांनी आपआपलं लॉटरीचं तिकीट नीट तपासा आणि त्यांना लॉटरी लागली आहे की नाही याची खात्री करून घ्या. या लॉटरी विजेत्या नशीबवान व्यक्तीचा सध्या शोध सुरु आहे.


नक्की कोण आहे 'हा' नशीबवान व्यक्ती


ब्रिटन सरकार समर्थित राष्ट्रीय लॉटरीचा लकी ड्रॉ एका भाग्यवान व्यक्तीला लागला आहे. सेट फॉर लाईफ ड्रा ही लॉटरी जिंकणाऱ्या भाग्यवान व्यक्तीला दरमहार 10 हजार पाऊंड म्हणजे सुमारे 11 लाख रुपये दिले जातील. ही लॉटरी जिंकणाऱ्या व्यक्तीला पुढील 30 वर्षे दर महिन्याला ही रक्कम दिली जाईल. पण आतापर्यंत सेट फॉर लाईफ लॉटरीचा भाग्यवान विजेता अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे सरकारने ही लॉटरी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांच तिकीट तपासण्यास सांगितलं आहे. दरम्यान, या व्यक्तीकडे डिसेंबर 2023 पर्यंतला वेळ आहे. या वर्षाच्या डिसेंबरपर्यंत हा भाग्यवान विजेता त्याचं बक्षीसाची मालकी घेऊ शकतो.


काय आहे प्रकरण?


ब्रिटनच्या सरकार-समर्थित नॅशनल लॉटरीने सेट फॉर लाइफ ग्राहकांना त्यांची लॉटरीची तिकिटे तपासण्याचं आवाहन केलं आहे. ग्राहकांनी त्यांचं तिकीट तपासून आपणं बक्षीस जिंकले आहे की नाही हे पाहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भाग्यवान विजयी तिकीट ब्रिटनमधील दक्षिण हॉलंड येथून विकत घेतलं होतं, अशी माहिती ब्रिटनच्या द मेट्रो न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. या माहितीनुसार, या तिकिटाच्या बक्षीसावर दावा करण्यासाठी भाग्यवान विजेत्याकडे 2 डिसेंबर 2023 पर्यंत वेळ आहे. 5 जून रोजी, 2, 5, 21, 34 आणि 35 क्रमांकाचे लाईफ बॉल लकी ड्रॉमध्ये 6 बरोबर जुळले होते आणि या विजेत्याला 38 कोटींची लॉटरी लागली. पण, हा भाग्यवान विजेता अद्याप सापडलेला नसून त्याचा शोध सुरु आहे.


लॉटरी कंपनी काय सांगितलं?


लॉटरी कंपनीने याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, ते या भाग्यवान रहस्यमय माणसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्याच्याकडे एवढ्या मोठ्या रकमेचे लॉटरीचे तिकीट आहे. हे तिकीट आयुष्य बदलणारे तिकीट असल्याचे राष्ट्रीय लॉटरी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या नशीबवान विजेत्याला पुढील तीस वर्षांसाठी दर महिन्याला 10,000 पौंड म्हणजे सुमारे 11 लाख रुपये दिले जातील, ही मोठी रक्कम आहे.