Most Expensive Tea:  भारतीयांच्या दिवसाची सुरुवात एक कप चहाने होते. बाजारात विविध प्रकारची चहा पावडर उपलब्ध आहे. या चहा पावडरमध्ये विविध प्रकार आढळून येतात. त्यांची वैशिष्ट्ये, गुणधर्मानुसार याच्या किंमतीतही बदल होतो. काही स्वस्त आणि काही महागडी चहा पावडर ( Most Expensive Tea) मिळते. एका खास चहा पावडरच्या एक किलोच्या पॅकेटची किंमत तब्बल 9 कोटी रुपये आहे. एवढ्या किंमतीत तर छानसं घर, लक्झरी कार खरेदी करता येईल. एका चहा पावडरची एवढी किंमत का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 


जगातील सर्वात महागडी चहा पावडर


जगातील सर्वात महाग चहा पावडर चीनमध्ये मिळते. या चहा पावडरचे नाव डा-होंग पाओ टी (Da-Hong Pao Tea) आहे. चीनमधील फुजियानमधील वुईसन भागात चहा पावडर मिळते. विशेष म्हणजे ही चहा पावडर याच भागात मिळते. इतर कोणत्याही ठिकाणी मिळत नाही. या चहा पावडरची किंमत प्रति किलो 9 कोटी रुपये आहे. 


एवढी महाग किंमत का?


ही चहा पावडर दुर्मिळ झाली आहे. चीनमध्ये या चहा पावडरची मोजकीच झाडे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून वर्षभरात अतिशय कमी प्रमाणात चहा पावडर मिळते. डा-होंग पाओ टी ची पाने अतिशय कमी असतात. काही ठिकाणी ग्राहक 10 ग्रॅम चहा पावडरसाठी 10 ते 20 लाख रुपये मोजतात. सामान्य चहाप्रमाणे या चहाचे उत्पादन घेतले जात नाही. एका विशिष्ट झाडातूनच चहा पावडर निवडली जाते. 


गंभीर आजारावर परिणामकारक


चीनच्या जीवनशैलीत चहाचे एक वेगळे स्थान आहे. काही प्रकारचे चहा हे आरोग्यदायी, आजारांवर परिणामकारक ठरतात, असे चीनमध्ये म्हटले जाते. चीनमध्ये मिळणारी ही महागडी चहा पावडरदेखील आरोग्यदायी असल्याचे म्हटले जाते. या चहा पावडरमुळे अनेक गंभीर आजार बरे होत असल्याचे म्हटले जाते. 


चीनमुळे जगभरात चहा


जगभरात चहा लोकप्रिय होण्यामागे चीनचा मोठा वाटा असल्याचे म्हटले जाते. जपानमध्ये सहाव्या ते आठव्या शतकांत चीनमधून बौद्ध भिक्षूंमार्फत चहाचा प्रथम प्रसार झाल्याचे म्हटले जाते. त्यानंतर पुढे मध्य आशिया आणि युरोपात चहा प्रवास, व्यापाराच्या मार्फत पोहचला. भारतात चहाची लागवड ब्रिटिशांनी केली. 


जगातील 26 देशांमध्ये चहाची लागवड करण्यात येते. चीन, जपान, भारत, बांगला देश, श्रीलंका, तैवान, इंडोनेशिया, मलेशिया, केनिया, मालावी, युगांडा, तुर्कस्तान, ब्राझिल, अर्जेंटिना, रशिया आदी देशांमध्ये चहाची लागवड होते.