Kay Jhadi Kay Dongar Kay Hotel Song : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याचं पाहायला मिळत आहे. या दरम्यान शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. याची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा होत आहे. 'काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल... ओकेमध्ये हाय...', अशी ऑडीओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली. आता यावर एक गाणं बनवण्यात आलं आहे. शहाजीबापू यांच्या व्हायरल कॉलनंतर मिम्सचा सोशल मीडियावर महापूर आला. त्यातच आता या नव्या गाण्यानं सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.


'काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल...' हे गाणं S.K Star Music Company या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. कुलदीप जाधव या कलाकाराचं हे गाणं आहे. सचिन जाधव यांनी गायलेल्या या गाण्याचे बोल 'काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल... सारं ओकेमध्ये हाय गं...' असे आहेत. हे गाणं सध्या प्रचंड गाजत आहे.


महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठा सत्तापेच निर्माण झाला आहे. सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीमध्ये आहेत. बंडखोर आमदार शहाजी बापू यांनी गुवाहाटी येथील निसर्गाचं त्यांच्या गावरान आणि रांगड्या भाषेत वर्णन केलं. याची ऑडीओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर आता या गाण्यानंही चांगलाच धुमाकूळ घातला आहे.



 


शहाजी पाटील यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे. सोशल मीडियात त्यांच्या नावाच सध्या ट्रेण्ड आहे. गुवाहटीत पोहोचलेल्या शहाजीबापू पाटील यांची सध्या महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. शहाजी पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला साथ देत आधी सुरत आणि त्यानंतर गुवाहटी गाठली. त्यानंतर काळजीपोटी एका कार्यकर्त्यानं शहाजी पाटील यांना फोन लावला आणि शहाजीबापूंनी गुवाहटीचं जे वर्णन केलं ते चांगलचं व्हायरलं झालं.


महत्त्वाच्या इतर बातम्या