Treasure Stolen by Hitler : जगभरात अजूनही अनेक गुपितं लपलेली आहेत, असं म्हटलं जातं. अद्यापही अनेक गुप्त खजिन्यांचा शोधही अनेक दशकांपासून सुरु आहे. त्यातील एक गुप्त खजिना आता इतिहासकारांना सापडला आहे. संशोधकांनी हिटलरच्या गुप्त खजिन्याचा शोध लावला आहे. पोलंडमधील संशोधकांना रेल्वे ट्रॅकच्या 5 फूट खाली सोन्यानं भरलेली खोली सापडली आहे.


हिटलरचा 'गुप्त खजिना' सापडला


पोलंडमधील इतिहासकारांच्या पथकाला रेल्वे बंकरमधून मोठा खजिना सापडला आहे. पोलंडमध्ये मामेर्की बंकरमध्ये खोदताना दुसऱ्या महायुद्धासंबंधित एक मोठं रहस्य उघड झालं आहे. हिटलरने लपवलेला चोरीचा खजिना पोलंडमध्ये सापडला आहे. सोन्यानं भरलेली एक खोली पोलंडमध्ये मामेर्की येथील रेल्वे रुळांच्या पाच फूट खाली सापडली आहे. हिटलरने चोरलेलं सोनं या खोली लपवल्याचं म्हटलं जात आहे.


रेल्वे ट्रॅकच्या 5 फूट खाली सापडली सोन्यानं भरलेली खोली


जॅकीज हिस्टोरिकल अँड एक्सप्लोरेटरी असोसिएशनची एक टीम पोलंडमधील मामेर्की बंकरमध्ये खोदकाम करत होती. यावेळी रेल्वे ट्रॅक आणि कारच्या चाकांवर काहीतरी अडथळा निर्माण झाल्याचं आढळलं. यावेळी खोदकाम केल्यावर तिथे सोन्यानं भरलेली खोली सापडली. येथे हिटलरने युद्धादरम्यान चोरीला गेलेला खजिना लपवला असल्याचं, ब्रिटीश मीडियानं म्हटलं आहे.


जमिनीपासून पाच फूट अंतरावर सापडली खोली


संशोधकांच्या पथकाने वारमिया आणि माजुरी प्रांतात जमिनीपासून पाच फूट खाली खोदल्यावर त्यांना हा खजिना सापडला आहे. हे ठिकाण हिटलरच्या वुल्फ लेअर बंकरपासून काही मैलांवर जर्मन लष्कराच्या सर्वोच्च कमांडचे मुख्यालय होते. मामेर्की म्युझियमचे संचालक बार्टलोमीज प्लेबन्स्की यांनी सोशल मीडियावर हा खजिना सापडल्याची माहिती दिली आहे.


बार्टलोमीज प्लेबन्स्की यांनी सांगितलं की, 'मामेरकी ते वुल्फ्स लेअरपर्यंत एक जुना रेल्वे ट्रॅक आहे, याबाबत सर्वांनी ऐकलं होत आहे. पण त्याच्या आतमध्ये आजही रेल्वे ट्रॅक असल्याचं कोणालाच माहीत नव्हते. हे खूप आश्चर्यकारक आहे कारण आम्हाला माहित नव्हतं की येथूनही एक रेल्वे ट्रॅक जात आहे.'


सोव्हिएत युनियनवरील हल्ल्यानंतर खजिना गायब


इतिहासकार या खजिन्याचा उल्लेख 'जगातील आठवं आश्चर्य' म्हणत आहेत. जानेवारी 1945 मध्ये, हिटलरच्या नाझी सेनेनं सोव्हिएत युनियनवर हवाई हल्ला आणि हल्ल्यानंतर, हा सर्व खजिना गायब झाला. यानंतर काहींनी दावा केला होता की, हा खजिना स्फोटात नष्ट झाला असावा, तर काहींनी शक्यता वर्तवली होती की, हिटलरने तेथील खजिना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केला असावा.


खजिना झाला होता गायब


मीडिया रिपोर्टनुसार, खजिना सापडलेली खोली 1700 च्या दशकात रशियन सम्राट पीटर द ग्रेटसाठी बांधली गेली होती. 1941 मध्ये सोव्हिएत युनियनच्या आक्रमणाआधी यामध्ये मौलव्यान वस्तू आणि सोन्याच्या दागिन्यांचा भरणा होता. आक्रमणादरम्यान नाझींनी ही लुटलं. सेंट पीटर्सबर्गजवळील कॅथरीन पॅलेसमधून चोरी केल्यानंतर हा खजिना गायब झाला होता. आता सापडलेली ही खोली हिटलरचा गुप्त खजिना असल्याचं मानलं जातं आहे.


युरोपातही शोध सुरू होता खजिन्याचा शोध


जगभरातील खजिना शोधणार्‍यांनी संपूर्ण युरोपमध्ये हिटलरने लपवलेल्या या खजिन्याचा शोध घेतला. याआधी खजिना शोधणार्‍यांनी दावा केला होता की,त्यांना एका गुप्त बंकरसाठी छुपा प्रवेशद्वार सापडला होता. त्यांनी दावा केला की हे प्रवेशद्वार त्यांना उत्तर-पूर्व पोलिश शहर वेगोर्जेव्होजवळील खजिन्याकडे घेऊन जाऊ शकते. पोलंडमधील मामेर्की म्युझियम, मामेर्की गावातील माजी जर्मन बंकरजवळील खजिन्याचा 2016 चा शोध पूर्णपणे अयशस्वी झाला. त्यानंतर आता हा खजिना सापडला आहे.


इतर बातम्या :


भारतातील 'या' गावात महिला परंपरा म्हणून राहतात निर्वस्त्र, काय आहे यामागचं कारण?