Trending Video : नवरदेवाला उत्साह चांगलाच भोवला आहे. नवरदेवाच्या चुकीमुळे त्याच्या मित्राला जीव गमवावा लागला आहे. आम्ही असं का म्हणतोय हे तुम्हाला व्हायरल झालेला व्हिडीओ बघून कळेल. लग्नात नवरदेवाने उत्साहाच्या भरात केलेल्या गोळीबारामध्ये त्याच्या एका सैनिक मित्राचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. नवरदेवाच्या चुकीमुळे त्याच्या मित्राला जीव गमवावा लागल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या मित्राच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत सैनिक मित्र हाच त्याच्या कुटुंबाचा आधार होता. त्याच्या मृत्यूवर हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेवर तुमचाही विश्वास बसत नसेल, पण हे खरं आहे. लग्नामध्ये उत्साही नवरदेव हर्ष यानं फायरिंग केली. पण या गोळीबारात त्याच्या सैनिक मित्राला जीव गमवावा लागला. मृत सैनिकाचं नाव बाबूलाल यादव असं आहे. कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या बाबूलालचा जीव गेल्यानं सर्वजण शोकसागरात बुडाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील सैनभद्र जिल्ह्यात घडली आहे. मित्राच्या लग्नासाठी म्हणून गेलेल्या बाबूलाल यादवचा या घटनेत मृत्यू झाला आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नसोहळा सुरु आहे. वराभोवती वऱ्हाडी मंडळीचा गराडा आहे. आनंदाच्या भरात नवरदेव बंदुक बाहेर काढतो आणि हवेत फायरिंग करु लागतो. मात्र यावेळी चुकून गोळी बाबूलाल याला लागते. यानंतर आजूबाजूचे लोक घाबरतात आणि जखमी बाबूलालचा रुग्णालयात दाखल करतात. पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच बाबूलालचा मृत्यू होतो.
या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ आयएएस अधिकारी दिपांशू काब्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, 'लग्नात हर्षनं केलेल्या गोळीबारात त्याच्याच मित्राला गोळी लागली. हा दिखावा करताना एकाचा जीव गेला आहे. पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आपलं काम करेल पण गेलेला जीव परत येणार नाही. आपण दिखावा करणं सोडल्याशिवाय हे थांबणार नाही.'
संबंधित इतर बातम्या
Titanic 2.0 : विशालकाय हिमनगावर धडकलं जहाज, पुढे काय घडलं? पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ
Viral Video : गाढवानं कुत्र्याला घडवली अद्दल, नक्की काय घडलं तुम्हीच पाहा
Trending Video : भूतदया! विजेच्या धक्क्यातून दुकानदारानं वाचवले गायीचे प्राण