Tea Sleep: जेव्हा आपण एक कप चहा (Tea) बनवत असतो, तेव्हा जवळपास 70 ते 80 टक्के कॅफिन (Caffeine) पाण्यात मिसळलं जातं. चहामध्ये असलेल्या कॅफिनमुळे तरतरी येते आणि मेंदूला चालना मिळते. आपला थकवा हा एडेनोसिन नावाच्या न्यूरोमोड्युलेटरमुळे येतो, जो दिवसभराच्या कामानंतर आपल्या शरीरात तयार होतो.


जेव्हा एडेनोसाईन (Adenosine) हे एडेनोसाईन रिसेप्टर्सशी (Adenosine Receptor) संपर्कात येतात, तेव्हा आपल्याला थकवा जाणवू लागतो आणि आपल्याला झोपावसं (Sleepy) वाटतं. पण जेव्हा आपण कॅफीनचं सेवन करतो तेव्हा कॅफीन एडेनोसिन रिसेप्टर्सना गोंधळात टाकते आणि तिचा एडेनोसाइनशी संपर्क येत नाही, त्यामुळे झोप देखील लागत नाही आणि थकवा दूर होतो.


या कारणामुळे लागत नाही झोप


एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कॅफिनचा परिणाम अल्कोहोलसारखा जास्त काळ राहतो, तर एखाद्याच्या शरीरात कॅफिनचा परिणाम कमी काळ राहतो. कॅफिनचं एका तासाच्या पचन होतं. कोका-कोला, एनर्जी ड्रिंक्स आणि चॉकलेट यांसारख्या सामान्यतः वापरल्या जाणार्‍या शीतपेयेमध्येही कॅफिन असतं, परंतु जर आपण त्याचं सेवनच केलं नाही, तर त्याचा आपल्या झोपेवर देखील परिणाम होत नाही.


जर तुम्ही अगदी ठराविक प्रमाणात कॅफिनचं सेवन केलं असेल तर तुमच्या शरीरातून 3 ते 4 तासांत त्याचा परिणाम निघून जाईल. वेगवेगळ्या लोकांमध्ये कॅफिन वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतं. त्यामुळे कॅफिनचं अतिसेवन काहींसाठी लाभदायक ठरतं, तर काहींसाठी ते धोकादायक ठरतं. चहामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कॅफिन आढळतं. कॅफिनमध्ये आढळणारे घटक हे निद्रानाशाचे कारण आहे, त्यामुळेच व्यक्तीची झोप दूर होते.


या गोष्टींची काळजी घ्या


साधारणपणे प्रत्येक व्यक्तीसाठी 200-300 मिलीग्रॅम कॅफिनचं सेवन सुरक्षित आहे. पण जर तुम्ही चिंतेत आहात, तुमची झोप व्यवस्थित आणि पुरेशी होत नसेल, झोपेसाठी तुम्ही एखादं औषध घेत असाल, तर अशा वेळी जास्त प्रमाणात चहा न पिणं तुमच्यासाठी योग्य ठरेल. झोपेच्या 4 तास आधी देखील चहाचं सेवन करू नये.


जर कॅफिनमुळे तुमच्या शरीरावर कोणताही परिणाम जाणवत नसेल, तर तुम्ही कधीही हवी तेव्हा चहा पिऊ शकतात. पण झोपण्याच्या 4 तासांआधी चहा पिणं टाळलेलंच चांगलं राहील. कॉफी आणि चहा हे दोन्ही पेयं प्रमाणात पिणं शरीरासाठी लाभदायक ठरेल, त्यामुळे त्याची जास्त सवय लावून घेऊ नका.


हेही वाचा:


Health Tips: पाणी कमी प्यायल्याने होतात गंभीर आजार; दररोज किती ग्लास पाणी प्यावे? जाणून घ्या...