Fridge Tips: असे काही लोक असतात, ज्यांना मध्यरात्री उठून काहीतरी खाण्याची इच्छा होते, म्हणून ते आपल्या घरातला फ्रिज (Fridge) हा बेडरूमजवळ ठेवणंच पसंत करतात. अनेकजण झोपण्याच्या खोलीतच फ्रीज ठेवतात. जर तुम्हीही असं करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. असं करणं व्यावहारिक नसून ते अत्यंत धोकादायक असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. झोपायच्या खोलीतच फ्रिज ठेवणं किती धोकादायक आहे? हे या संशोधनाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
झोपायच्या खोलीत रेफ्रिजरेटर ठेवणं किती सुरक्षित?
झोपायच्या खोलीत (Bedroom) रेफ्रिजरेटर ठेवणं पूर्णत: असुरक्षित असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. तर इथे मुख्य मुद्दा रेफ्रिजरेटरमधून निघणाऱ्या रेडिएशनचा आहे. परंतु प्रत्यक्षात फ्रिजचे रेडिएशन इतके कमी आहेत की ते नगण्य मानले जाऊ शकतात. आजकाल बहुतेक रेफ्रिजरेटर इलेक्ट्रिक आहेत, त्यामुळे गॅस गळती ही देखील चिंताजनक बाब नाही. रेफ्रिजरेटरमध्ये गॅस हा कॉम्प्रेसरमध्ये बंद केला जातो. त्यामुळे गॅसची गळती होण्याची शक्यता नाही.
मात्र रेफ्रिजरेटर खराब झाल्यास निर्माण होणारे काही रेडिएशन्स तुमच्या खोलीत धोका निर्माण करण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट म्हणजे, कधी-कधी रेफ्रिजरेटरला आग लागण्याचा धोका असू शकतो. पण असं खूप कमी वेळा घडतं आणि आजकालच्या नवीन मॉडेल्सच्या फ्रिजमध्ये सेफ्टी फिचर्स देखील उपलब्ध असतात.
रेफ्रिजरेटर झोपण्याच्या खोलीत का ठेवू नये?
रेफ्रिजरेटर अतिरिक्त उष्णता बाहेर टाकतो, जी हवेत पसरते. फ्रीजमधून येणाऱ्या उष्णतेमुळे तुमच्या बेडरूमचं तापमान वाढू शकतं. जर तुम्हाला तरीही तुमचा फ्रीज बेडरूममध्ये ठेवायचा असेल तर तो एक्झॉस फॅन किंवा खिडकीजवळ ठेवा, ज्यामुळे उष्ण तापमान खोलीच्या बाहेर पडेल. फ्रिज हा दिवसभर सुरुच राहतो आणि यातून थोडा भुनभुनणारा आवाज ऐकू येतो. जर तुम्ही कमी झोप असणाऱ्यांपैकी एक असाल तर फ्रिज खोलीत ठेवणं तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं.
जीव गमावण्याचाही धोका
फ्रीऑन हा एक वायू आहे जो लीक होऊ शकतो. जर द्रव स्वरूपात या गॅसती गळती होत असेल, तर हे एक अत्यंत दुर्मिळ प्रकरण आहे. परंतु हे आजाराचं कारण ठरू शकतं. जर या गॅसची गळती वायु स्वरुपात झाली तर ते धोकादायक ठरू शकतं. यात अत्यंत विषारी वायू असतो, ज्यामुळे श्वास घेणं कठीण होतं, यात गुदमरुन जीव गमावण्याचाही धोका असतो. यामुळे तुम्ही तुमचा फ्रिज नियमितपणे तंत्रज्ञांकडून चेक करुन घेतला पाहिजे, फ्रिजची वेळच्या वेळी सर्व्हिसिंग केली पाहिजे.
हेही वाचा: