Trending Video : तुम्ही आतापर्यंत लोक व्यायाम करतानाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पुश-अप्स तर कधी पुल-अप्सचे व्हिडीओ फिटनेस फ्रिक लोक शेअर करत असतात. पण तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला हेलिकॉप्टरला लटकून पुल-अप्स करताना पाहिलं आहे का? नाही ना मग आम्ही तुम्हाला आज हे दाखवणार आहोत. एका तरुणानं चक्क हेलिकॉप्टरला लटकून अनोख्या पद्धतीनं पुल-अप्स केले आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय बनला आहे. इतकंच नाही तर याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) झाली आहे.


गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हााल दिसेल की, फिटनेस इन्फ्लुएंसर (Fitness Influencer) अल्बर्स आधी हेलिकॉप्टरला लटकत एका मिनिटात 24 पुल-अप्स करतो. त्याच्यानंतर स्टॅन ब्राउनी (Stan Bruininck) याने एका मिनिटात 25 पुल-अप्स करत नवा विक्रम केला. या दोघांनीही रोमन सह्रादियन याचा हेलिकॉप्टरला लटकत एका मिनिटात सर्वाधिक पुल-अप्स करण्याचा विक्रम मोडला आहे. रोमन सह्रादियन याच्या नावे 23 पुल-अप्स करण्याचा रेकॉर्ड होता.


पाहा विश्वविक्रम करतानाचा व्हिडीओ



गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून नोंद


गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. त्यांनी याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने म्हटलं आहे की, 'स्टॅन ब्राउनी (Stan Bruininck) याने एका मिनिटात 25 पुल-अप्स करत नवा विक्रम केला आहे.' हा नवीन विश्वविक्रम बनवण्यासाठी दोघांनीही खूप मेहनत घेतली आणि कठोर प्रशिक्षण घेतलं. याचं मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर स्टॅननं जुना विक्रम मोडल नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. 


इतर संबंंधित बातम्या