Most Expensive Venom : जगात सापांचं विष सर्वात विषारी असते, हे आपण सर्वांनीच ऐकलं आहे. विशेषत: क्रोबा जातीच्या सापाचं विष सर्वात विषारी असल्याचं म्हटलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का, सर्वात महाग विष कोणाचं असतं. जगात सर्वात महाग विकलं जाणारं विष कोणत्याही सापाचं (Snake) नसून विंचवाचं (Scorpion) असतं. हे विष जर तुमच्या शरीरामध्ये गेलं तर यामुळे भयंकर वेदना होतात, ज्या सहन करणं अशक्य असतं. या विंचवाच्या 1 मिलीलीटर विषाची किंमत सुमारे 8.5 लाख रुपये आहे. डेथस्टॉकर विंचवामध्ये (Deathstalker Scorpion) हे सर्वात महागडं विष आढळतं. 


'या' विंचवाचं विष सर्वात महाग


डेथस्टॉकर विंचवामध्ये (Deathstalker Scorpion) हे विष आढळतं. हे विष जगातील सर्वात महाग विष आहे. डेथस्टॉकर विंचवाचं विष एवढं महाग असण्याचं कारण म्हणजे, हा विंचू एका वेळी फक्त दोन मिलीलीटर विष देऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला एक गॅलन विष हवं असेल तर तुम्हाला सुमारे 26 लाख विंचवांचं विष काढावं लागेल. या विंचवाचं विष इतकं धोकादायक आहे की, जर या विंचवानं तुम्हाला दंश केला तर तुम्हाला असह्य वेदना होतील. त्या सहन करण्यापलिकडे असतात. 


कुठे सापडतो 'हा' विंचू?


डेथस्टॉकर विंचू (Deathstalker Scorpion) संपूर्ण जगात फक्त वाळवंटी भागातच आढळतो. उत्तर आफ्रिकेपासून मध्य पूर्वेपर्यंतच्या वाळवंटात तुम्हाला हा विंचू सहज सापडेल. हा विंचू राजस्थानच्या थारच्या वाळवंटातही आढळतो. या विंचवाच्या 1 मिली विषाची किंमत सुमारे 8.5 लाख रुपये आहे. या विंचवाचे विष काढण्याचे काम राजस्थानातील काही लोक करतात. मात्र, हे काम फार जोखमीचं असल्यामुळे ते या कामासाठी अधिक दर आकारतात. 


क्लोरोटॉक्सिन विष सर्वात महाग


डेथस्टॉकर विंचवामध्ये (Deathstalker Scorpion) क्लोरोटॉक्सिन (Chlorotoxin) नावाचं विष आढळतं. हे विष तुमच्या शरीरात गेल्यावर तुम्हाला खूप वेदना होतील, ज्या सहन करणे फार कठीण असेल. 


'या' विषाचा वापर काय?


क्लोरोटॉक्सिन (Chlorotoxin) विषाचा वापर काही गंभीर आजारांच्या उपचारासाठी केला जातो. या विंचवाचे विष मेंदू आणि मणक्याच्या पेशींमध्ये होणाऱ्या काही कर्करोगांच्या उपचारामध्ये मदत करते. याच्या मदतीने ट्यूमरचा आकार आणि स्थान शोधण्यात देखील मदत होते. या विंचूचा वापर करून काही शास्त्रज्ञांनी डासांच्या आतून मलेरिया नष्ट केला होता. या विंचवाच्या विषापासून इतर अनेक प्रकारची औषधंही बनवली जातात.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Fat People: पोट वाढलं असेल तर इथे मिळतो सुपरस्टारचा दर्जा; चरबी वाढवण्यासाठी 'हे' लोक पितात रक्त