Dating App Scam: यंदाच्या व्हॅलेंटाईन डे दिवशी अनेकांचं सूत जुळलं, अनेकांना त्यांचा साथीदार मिळाला. पण जे लोक अजूनही सिंगल राहिलेत त्यांचं काय? मग असे सिंगल लोक जोडीदार शोधण्यासाठी ऑनलाईन डेटिंग अॅप्सचा वापर करतात. पण हे अॅप्स वापरताना सावधगिरी बाळगावी लागते. याचे कारण असे की अनेक स्कॅमर ऑनलाइन डेटिंगच्या नावाखाली तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात. प्रेमाच्या जाळ्यात अडकून ते केवळ पैसेच चोरत नाहीत तर वैयक्तिक तपशीलही चोरतात. अनेकवेळी समोरुन गोड आवाजाची मुलगी बोलत असते पण त्यामागे आवाज बदलून एखादा ठग तुम्हाला गंडवत असतो. म्हणजे या डेटिंग अॅपवर तुमच्याशी 'पूजा' बोलेल पण तुमचे अकाउंट हॅक करुन खात्यातून पैसे मात्र 'विशाल' उडवेल.


मुलींच्या नावाने प्रोफाईल 


या घोटाळेबाजांचे मुख्य लक्ष्य अविवाहित मुले असतात. ते एखाद्या मुलीच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करतात. त्यावर सुंदर मुलीचा फोटो लावला जातो. मग मुलांशी गप्पा मारून ते पैसे चोरण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही चॅटिंग करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.


या घोटाळ्यात समोरचा ठग दुसऱ्याचा फोटो आणि वैयक्तिक माहिती वापरून बनावट प्रोफाइल तयार करतो. मग हळूहळू तुमच्याशी मैत्री करतो आणि तुमच्याकडून पैसे किंवा वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करतो. तो पटकन पैसे मागणार नाही. तुम्हाला विश्वासात घेऊन म्हणा किंवा तुमच्याशी पक्की मैत्री केल्यावर मात्र तो तुम्हाला गंडा घालेल.


Dating App Chat: डेटिंग अॅपवर चॅट करताना सावधान


स्कॅमर फिशिंग स्कॅम करण्यासाठी ईमेल किंवा मेसेज पाठवेल. यामध्ये मालवेअर असलेली एखादी वेबसाइट देखील समाविष्ट असू शकते जी तुमची संवेदनशील माहिती चोरण्यासाठी वापरली जाऊ शकते. डेटिंग अॅप्सवर बोलत असताना, स्कॅमर चॅटिंगदरम्यान अशी लिंक शेअर करेल त्यावर क्लिक केल्यावर तुमची सर्व वैयक्तिक माहिती त्याच्यापर्यंत पोहोचेल.


डेटिंग अॅपवर तुम्ही अनोळखी व्यक्तीशी बोलत असताना व्हिडीओ कॉलिंग टाळा. व्हिडीओ कॉलिंग केल्यानंतर समोरचा व्यक्ती तुमचा व्हिडीओ काढू शकतो, तो मॉर्फ करु शकतो


व्हिडीओ होऊ शकतो मॉर्फ


हे शक्य आहे की समोरची व्यक्ती स्कॅमर आहे आणि तुमचा व्हिडिओ मॉर्फ करते आणि त्याचा गैरवापर करुन तुम्हाला ब्लॅकमेल करु शकते. त्याचा वापर करुन तुमच्याकडून पैसे उकळू शकते. अगदी दररोज असे असंख्य लोक अशा प्रकारच्या कारस्थानाला बळी पडताना दिसतात. 


तुम्ही जोडीदार शोधण्यासाठी ऑनलाइन डेटिंग अॅप वापरत असाल आणि त्यावर तुम्हाला कोणी पसंत पडलं असेल तर त्या व्यक्तीची संपूर्ण खात्री करुन घ्या. त्या व्यक्तीविषयी संपूर्ण माहिती घ्या, आणि मगच पुढे पाऊल टाका.


महत्त्वाचं म्हणजे डेटिंग अॅप निवडताना त्याला Google Play Store किंवा Apple Store वर चांगले रेटिंग मिळाले आहे का याचा तपास करा आणि मगच ते इन्स्टॉल करा. 


ही बातमी वाचा: