Trending News : सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही खरंच मनाला सुखावणारे असतात, तर काही मन हेलावणारे. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून निसर्गाच्या दैवी चमत्कारानं डोळे दिपतील. या व्हिडीओमध्ये समुद्राच्या लाटा एवढ्या उंच उसळल्या आहेत की, जणू त्या आकाशाला टेकल्याचा भास होत आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहून आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ थोडा जुना आहे. Buitengebieden ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एका विशाल समुद्रात उंच उंच लाटा उसळल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये स्लो मोशनमध्ये लाटा उसळताना दिसत आहे. यामध्ये लाटा वर आभाळाल्या टेकल्याचा भास होत आहे. काही क्षणांसाठी हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसणारा प्रसंग खरा आहे. निसर्गाचा चमत्कारच जणू. 40 सेकंदांचा हा व्हिडीओ आश्चर्यचकित करण्यासोबतच निसर्गाच्या किमयेचं उदाहरण देतो. पण ढगांची रचना खरी नाही. हे समुद्री एरोसोल (SSA) आहे. जी एक नैसर्गिक घटना आहे, ती महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागावरील बुडबुडे फुटल्यामुळं तयार होते.
व्हिडीओ सर्व नेटकऱ्यांना अचंबित करत आहे. तसेच, युजर्स हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला तब्बल 1 मिलियनहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत. तर 68 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, नेटकरी यावर आपल्या वेगवेगळ्या रिअॅक्शन देत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :