Bride and Groom Viral Video : सध्या सगळीकडे लग्नसराईचे दिवस सुरु झाले आहेत. लग्नाचा फिव्हर सोशल मीडियावरही (Social Media) मोठ्या प्रमाणात दिसतो. यामध्ये अनेकजण आपल्या लग्नातल्या काही हटके गोष्टी शेअर करत असतो. कधी लग्नाच्या मंडपात बाईकवरून वधूची एन्ट्री पाहायला मिळते तर कधी वर सुद्धा लग्नात हटक्या स्टाईलने नाचताना दिसतो. असे व्हिडीओ पाहून अर्थातच नेटकऱ्यांचं मनोरंजन होतं. त्यामुळे असे व्हिडीओ लवकर व्हायरल देखील होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये वर (नवरा) चक्क क्रिकेट खेळताना दिसतोय.


पाहा व्हिडीओ : 






मंडपातून मारला क्रिकेट शॉट


इन्स्टाग्रामवर वर्षा नावाच्या प्रोफाईलवर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये वधू-वर लग्नाच्या विधीदरम्यान मंडपात बसलेले दिसत आहेत. या दरम्यान, पंडित मंत्र पठण करताना दिसतात आणि वधू आणि वर उर्वरित विधी पूर्ण करतात. दरम्यान, वराचे मित्र गंमतीने वराच्या दिशेने एक फूल फेकतात. आणि वराने थेट लग्नमंडपातून क्रिकेट शॉट मारला. वराची फलंदाजीची शैली पाहून उपस्थित असलेला मित्र परिवार आणि नातेवाईकांना आपले हसू आवरता येत नाहीये. त्यामुळे लग्नमंडपात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले.    


व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले 


वराच्या मित्र मंडळींनी वराच्या दिशेने फूल फेकताच वराने जवळ असलेल्या ज्वेलरीच्या बॉक्सने चेंडूला फेकले. जे पाहून सोशल मीडियावर सगळेच या वराला क्रिकेटप्रेमी म्हणतायत. या व्हिडीओला एका दिवसात 32 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर, काही नेटकऱ्यांनी गंमतीशीर कमेंट्सही केल्या आहेत.    


महत्त्वाच्या बातम्या : 


Viral Video: 'न उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन', 21 वर्षीय मुलाने केलं 52 वर्षाच्या महिलेशी लग्न, पाहा व्हिडीओ