Watchman Shutting Office Doors : सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ तुफान चर्चेत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वॉचमन कंपनीच्या मेन गेटला टाळ लावत आहे. आता तुम्ही म्हणालं की, ही तर सर्वसामान्य बाब आहे. पण हा वॉचमन कर्मचारी ऑफीसमध्ये असताना बाहेरून मेन गेटला कुलूप लावताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
कंपनीने कर्मचाऱ्यांना ऑफिसमधेच कोंडलं, बाहेरुन लावलं कुलूप
हा व्हिडीओ एडटेक उद्योजक रवी हांडा यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. या व्हिडीओमध्ये वॉचमन ऑफीसच्या मुख्य दरवाजाला आतून कुलूप लावताना दिसत आहे. यावेळी उपस्थित व्यक्तीने वॉचमनचा व्हिडीओ चित्रीत केला आणि नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये, वॉचमनने सांगितले की, त्यांच्या संमतीशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याला बाहेर जाण्याची परवानगी न देण्याचा आदेश दिला आणि मेन गेटला टाळं लावण्यास सांगितलं.
पाहा व्हायरल व्हिडीओ :
'कोडिंग निन्जा' या कंपनीमधील व्हिडीओ व्हायरल
मीडिया रिपोर्टनुसार, या व्हायरल व्हिडीओवर अनेक कमेंट समोर येत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना रवि हांडा यांनी लिहिलं की, “भारतीय एडटेक संस्थापक आता त्यांच्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः डांबून ठेवत आहेत. इतर कुठेही असं काही करण्याची हिंमत होणार नाही." या व्हिडीओमध्ये 'कोडिंग निन्जा' या कंपनीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
कंपनीकडून चूक दुरुस्त
दरम्यान, हांडा यांनी कंपनीच्या वतीने आलेलं अधिकृत स्पष्टीकरण देखील पोस्ट केलं. यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की, एका कर्मचाऱ्याच्या खेदजनक कृतीमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. ही चूक तातडीने दुरुस्त केल्याचे कंपनीने सांगितलं आहे.
कंपनीनं कर्मचाऱ्यांची माफी मागितली
कंपनीने याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितलं की, दोन आठवड्यांपूर्वी आमच्या कार्यालयात एका कर्मचार्याने केलेल्या निंदनीय कृतीमुळे ही परिस्थिती उद्भवली होती. कर्मचाऱ्याने आपल्या चूकी कबूली दिल्यानंतर आणि त्याच्या कृतीमुळे झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागितल्यानंतर परिस्थिती तात्काळ सुधारण्यात आली." संस्थापकांनी या परिस्थितीबाबत खेद व्यक्त करत माफी मागितल्याचंही, कंपनीने निवेदनात सांगितलं आहे.