Cheapest Island: बॉलीवूड (Bollywood ) अभिनेते, अभिनेत्री किंवा एखाद्या श्रींमत व्यक्तीने बेट खरेदी केल्याबद्दल तुम्ही ऐकले असेलच. पण तुम्हाला माहित आहे का, तुम्हीही एक सुंदर बेट खरेदी करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बेटाची माहिती देणार आहोत, ज्याची किंमत खूपच कमी आहे. तुम्ही हे बेट मुंबई किंवा पुण्यामध्ये खरेदी केलेल्या फ्लॅटपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करू शकता. कसं? ते जाणून घेऊ...


एका रिपोर्टनुसार हे बेट मध्य अमेरिकेत आहे. इग्वाना बेट (Iguana island) म्हणून हे ओळखले जाते. हे बेट सर्व बाजूंनी निळ्या-हिरव्या पाण्याने वेढलेले असून यावरून आपण त्याच्या सौंदर्याचा अंदाज लावू शकता. या बेटवर तुम्हाला हिरवीगार झाडे आणि सुंदर दृश्य पाहायला मिळतील. निसर्गप्रेमींना हे बेट नक्कीच आवडेल.


Iguana island: इग्वाना बेटावर कोणत्या गोष्टी आहेत


इग्वाना बेटावर पाच एकर जमीन, एक घर आणि इतर गरजेच्या गोष्टी उपलब्ध आहेत. खाजगी रिअल-इस्टेट आयलंड इंकच्या वेबसाइटवर (Private Islands Inc) हे बेट विक्रीसाठी सूचिबद्ध केलं आहे. या वेबसाइटवरील जाहिरातीनुसार, इग्वाना आयलंडमध्ये (Iguana island) तीन बेडरूम आणि दोन-बाथरूम असलेले घर आहे. ज्यामध्ये रॅपराउंड पोर्च, डायनिंग रूम, बार आणि लिव्हिंग एरिया आहे. यासोबतच बेटाच्या दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त निवास व्यवस्था बांधण्यात आली आहे. हे एका अमेरिकन विकसकाने अत्याधुनिक तंत्रज्ञानासह बनवले आहे.


या बेटावर सर्व दिशांना पाहता तुम्हाला निळे-हिरवे स्वच्छ पाणी दिसेल, ज्यामुळे या बेटाचं सौंदर्य आणखी निखळपणे दिसतं. या बेटावरून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे मंत्रमुग्ध करणारं आहे. तसेच येथील रात्रीच शांत वातावरण ही तुम्हाला आवडेल. आयलँड्स इंकच्या वेबसाइटवरही ही माहिती देण्यात आली आहे. असं असलं तरी हे बेट जगापासून पूर्णपणे कापले गेले आहे. कारण येथे तुम्हाला वायफाय, फोन आणि टीव्ही सिग्नल मिळणार नाही.


Iguana island: Iguana island: किती आहे किंमत? 


वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, येथे एक स्विमिंगपूल  आणि हेलिपॅड बनविण्याची तयारी सुरू आहे. बेटाच्या पश्चिमेला मासेमारीचे क्षेत्रही आहे. याव्यतिरिक्त ऑन-साइट व्यवस्थापक आणि केअरटेकरसह बेट क्रू देखील इग्वाना बेटाच्या नवीन मालकांसाठी काम करणे सुरू ठेवण्यास उत्सुक आहेत. ते खरेदी करण्यासाठी केवळ 376,627 पौंड म्हणजेच 3.76 कोटी रुपये द्यावे लागतील. याबाबत अधिक माहिती तुम्ही privateislandsonline.com या वेबसाइटला भेट देऊन मिळू शकतात.