Viral Video - Man Dragged By Scooter In Bengaluru: कर्नाटकातील (Karnataka) बंगळुरूमध्ये (Bengaluru) एका व्यक्तीला दुचाकीने रस्त्यावर फरफटत नेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. चुकीच्या बाजूने येणाऱ्या स्कूटीस्वाराने कारला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर कार चालकाने दुचाकीस्वाराला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाऊ लागला. यादरम्यान कार चालकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता दुचाकीस्वार त्याला फरफटत घेऊन गेला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होत आहे. या घटनेत वृद्धाला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.


Viral Video: पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बंगळुरूमधील मागदी रोडवर घडली आहे. बंगळुरू (Bengaluru) पश्चिमच्या डीसीपींनी सांगितले की, वृद्धाला स्कूटरने रस्त्यावर फरफटत नेलेल्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. या तरुणाविरुद्ध गोविंदराज नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तो रुग्णालयात असल्याने त्याच्यावर नंतर कारवाई केली जाईल.


व्हिडीओत (Viral Video)  दिसत असल्याप्रमाणे रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी पाहिले की, एक तरुण एका वृद्धाला स्कूटीने फरफटत नेत आहे, तेव्हा इतर वाहनधारकांनी त्याचा पाठलाग केला आणि आपले वाहन आडवे घालून त्याला थांबवलं. तत्पूर्वी हा तरुण क्रूरपणे या वृद्धाला रस्त्याने फरफटत नेत स्कूटर चालवत होता. स्कूटर चालवताना तो सारखा मागे वळून पाहत होता की, त्याच्या स्कूटरला पडकलेल्या वृद्धाने स्कूटर सोडली की नाही. त्यांना इजा होता असल्याचं दिसत असतानाही या क्रूर तरुणाने आपली स्कूटर थांबवली नाही. लोक त्याला स्कूटर थांबवण्यासाठी आवाजही देत होते आणि याचा व्हिडीओ (Viral Video) देखील शूट करत होते. शेवटी त्याला अडवून स्कूटर थांबवण्यात आली. या नंतर स्कूटरला पडकलेल्या वृद्धाने सांगितले की, हा वाहनाला धडक देऊन पळत होता. तरुणाच्या या कृत्यानंतर जमलेल्या लोकांनी त्याला चांगलाच चोप दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.