Censor Board Certificate: चित्रपट निर्मिती आणि रिलीजमध्ये बॉलीवूड (Bollywood) जगातील सर्वात मोठे चित्रपट निर्मिती केंद्र मानले जाते.  दरवर्षी 20 भाषांमध्ये साधारण 1500 ते 2000 चित्रपट रिलीज होतात. आपण चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी जातो किंवा आजकाल आपण टिव्ही, मोबाईलवर चित्रपट पाहतो. चित्रपटाच्या सुरुवातीला पडद्यावर एक सर्टिफिकेटही दाखवलं जाते. हे सर्टिफिकेट स्क्रिनवर 8 ते 10 सेकंद दाखवले जाते. चित्रपट निर्मात्यांच्या दृष्टीने हे सर्टिफिकेट सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्याला सेन्सॉर सर्टिफिकेट (Censor Certificate) म्हणतात. कारण त्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होणे शक्य नााही. पण हे सर्टिफिकेट का महत्त्वाचे असते? चित्रपटाला मिळणाऱ्या सेन्सॉर सर्टिफिकेटमध्ये नेमकं काय असते?  असे अनेक प्रश्न पडतात. याविषयी जाणून घेणार आहे. 


सेन्सॉर सर्टिफिकेट स्क्रिनवर आल्यानंतर अनेका प्रश्न समोर येतात. परंतु चित्रपट निर्मात्यांच्या दृष्टीने हे प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे.  चित्रपटाच्या सर्टिफिकेशनसाठी सरकारने केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डची निर्मिती केली आहे. या बोर्डला सेन्सॉर बोर्ड म्हणून देखील ओळखले जाते. चित्रपटाच्या ॉ रिलीजपूर्वी या बोर्डातील सदस्य हा चित्रपट पाहतात आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सर्टिफिकेट देतात. या सर्टिफिकेटशिवाय चित्रपट रिलीज होत नाही. 


या सर्टिफिकेटमध्ये महत्त्वपूर्ण माहिती लिहिली जाते. जसे की चित्रपटाचे नाव, चित्रपटाचा कालावधी, चित्रपट किती तासांचा आहे तसेच यामध्ये किती रील आहे. जर सेन्सॉर बोर्डाला चित्रपटाच्या एखाद्या सीनवर  आक्षेप असेल तर तो सीन हटवण्यास देखील सांगतात. त्या संदर्भत देखील या प्रमाणपत्रवर लिहिले जाते.  सेन्सर बोर्ड हे सर्टिफिकेट यू,  यू/ए किंवा  ए  या कॅटेगरीमध्ये जारी केले जाते.


सर्टिफिकेटवर लिहिलेल्या कोडचा अर्थ काय?


यू चा अर्थ काय (Fit For Unrestricted Public)


जर सर्टिफिकेटमध्ये यू  लिहिला तर याचा अर्थ हा चित्रपट सर्व वयोगटातील लोकांसाठी बनवला आहे. लहान मुलांना देखील हा चित्रपट पाहता येणार आहे. हे सर्टिफिकेट धार्मिक आणि कौटुंबिक चित्रपटांसाठी दिले जाते.


यू/ए चा अर्थ काय


जर सर्टिफिकेटवर यू/ए लिहिले असेल तर याचा अर्थ होतो की, 12 वर्षाखालील मुलांना आपल्या आई वडिलांसह हा चित्रपट पाहता येणार आहे. 


ए चा अर्थ काय (For Adults) 


जर या चित्रपटाच्या सर्टिफिकेटवर ए लिहिले असेल तर हा चित्रपट फक्त 18 वर्षापुढील प्रेक्षकांसाठी बनवण्यात आला आहे.


एस चा अर्थ काय?


जक एखादा चित्रपट हा फक्त खास प्रेक्षकांसाठी बनवला असेल तर त्या सर्टिफिकेट वर एस लिहिले जाते. हा चित्रपट खास शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांसाठी बनवण्यात येतो.