मुंबई : आपण रोजच्या जीवनात अनेक गोष्टींचा वापर करतो. यापैकी अनेक गोष्टींचा मोठा इतिहास असतो, जो अनेकांनी माहिच नसतो. अशीच एक वस्तू म्हणजे ब्रा. ब्रा हा महिलांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे. सध्या बाजारात विविध प्रकारच्या ब्रा (Bra) उपलब्ध आहेत. तुम्हाला माहित नसेल पण ब्राचा इतिहास सुमारे 500 वर्ष जुना आहे. याचा अंदाज तुम्ही यावरुन लावू शकता की, इजिप्तमधील महिला याचा वापर करत असत. सर्वात पहिल्यांदा ब्राचा शोध कुणी लावला, ती कशापासून बनवण्यात आली होती. ब्राचा शोध कोणत्या देशात लागला, ब्राचा इतिहास काय आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घ्या.


'ब्रा'चा 500 वर्ष जुना इतिहास


'ब्रा'चा इतिहास सुमारे 500 वर्ष जुना आहे. इजिप्तमधील महिला याचा वापर करायच्या असं सांगितलं जातं. दरम्यान, सुमारे 500 वर्षात ब्रा चा प्रकार, ते बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तू आणि नाव यासर्वात फारच बदल झाला आहे. इजिप्शिअन महिला ब्रा परिधान करायच्या मात्र, त्या चामड्यापासून बनलेल्या असायच्या. चामड्यापासून तयार करण्यात आलेल्या ब्रा परिधान करणे फार सोयीचं नव्हचे. 


ब्रेस्ट बँड


ग्रीक आणि हेलेनिस्टिक सभ्यतेमधेही महिला ब्रा वापरत असत. ग्रीक आणि हेलेनिस्टिक सभ्यतेमधील महिला ब्रेस्ट बँड वापरत असत. दरम्यान,  भारतात ब्रा चा इतिहास फार जुना नाही. भारतात सुरुवातीपासून महिला शरीर झाकण्यासाठी साडी परिधान करायच्या. 


बाराव्या शतकात कॉर्सेटचा वापर


दरम्यान, वर्षानुवर्षे ब्राच्या प्रकारामध्ये बदल होत गेला. बाराव्या शतकात धातूच्या ब्राचा वापर वाढला. बाराव्या शतकातील महिला धातूपासून तयार केलेल्या कॉर्सेटचा वापर करायच्या. कॉर्सेटचा वापर एकोणीसाव्या शतकापर्यंत सुरु होता. त्यानंतर 1890 च्या दशकात धातूच्या कॉर्सेटची जागा कपड्याच्या कॉर्सेटने घेतली. 


महिला कंबर छोटी दिसावी आणि शरीर आकर्षक दिसावं यासाठी कॉर्सेटचा वापर करत असत. दरम्यान, कॉर्सेट वापरल्याने महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम व्हायचा. कॉर्सेट छाती आणि कमरेजवळ अतिशय घट्ट असल्याने त्या काळात डॉक्टरांनीही हे वापरण्याबाबत अनेकदा धोक्याचा इशारा दिला होता. 1900 नंतर कॉर्सेटचा वापर पूर्णपणे बंद झाला.


ब्रा हे नाव कसं पडलं?


ब्रा हा शब्द फ्रान्समधून आला. बीबीसी कल्चरमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, पहिली आधुनिक ब्रा फ्रान्समध्ये बनवण्यात आली होती. त्याचे नाव 'ब्रेसीअर' (brassiere) या शब्दावरून आलं आहे. हा फ्रेंच शब्द आहे. याचा अर्थ शरीराचा वरचा भाग. लाइफ मॅगझिननुसार, 30 मे 1869 रोजी फ्रान्सच्या हर्मिन कॅडोलने कॉर्सेटचे दोन तुकडे करून अंडरगारमेंट बनवले. या अंडरगारमेंटला कॉर्सलेट जॉर्ज असं नाव देण्यात आलं, ज्याचा वरचा भाग नंतर ब्रा सारखा परिधान केला आणि विकला गेला. तेव्हा इतिहासात विविध प्रकारच्या ब्रा ची पाहायला मिळतात, पण आजही याची ही वस्तू ब्रा म्हणून ओळखली जाते.


महत्त्वाच्या इतर बातम्या:


इंग्रजांकडून झालेल्या अपमानाचा बदला, रोल्स रॉयस कारमधून कचरा गोळा करण्याचा आदेश; वाचा या भारतीय महाराजाची रंजक कहाणी