Trending Birds Video : माणूस स्वत:च्या फायद्यासाठी नेहमीच निष्पाप प्राण्यांवर अन्याय करताना दिसून येतं. मानवानं जंगलं तोडून तिथे घरं आणि मोठमोठ्या इमारती बांधल्या मात्र, ते जंगल आणि तिथली झाडं घर असणाऱ्या प्राण्याबद्दल माणूस नेहमीच विसरतो. केरळमधील मलप्पुरममध्ये एक झाड तोडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मात्र हा व्हिडीओ बुल्डोझर किंवा झाडामुळे नाही तर वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. झाडावर बुल्डोझर चालवल्यावर झाड पडलं, मात्र यासोबत झाडावरील पक्षी आणि त्यांच्या पिल्लांचा चिरडून मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे झाड उन्मळून पडल्यानं त्या झाडावर राहणारे अनेक पक्षी चिरडून मृत्यूमुखी पडतात. इतकंच नाही तर झाडावरील पक्षांची अंडी आणि पिल्लं यांचा पडून मृत्यू झाल्याचं दिसत आहे. तसेच या घटनेत झाडावरील अनेक पक्षी जखमीही झाले आहेत.
झाड तोडण्याच्या घटनेवेळी पक्ष्यांच्या मृत्यूचा हा व्हिडीओ काही तासांतच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या दुर्दैवी घटनेवर नेटकरी हळहळ व्यक्त करत आहेत. या दुर्घटनेचा सर्वत्र चर्चेत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. अनेक वन अधिकाऱ्यांनीही हा व्हिडीओ शेअर करून दु:ख व्यक्त केलं आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?
हा व्हिडीओ केरळच्या मलप्पुरम भागातील आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारासाठी जेसीबीनं एक झाड तोडताना या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की झाड पडायला सुरुवात होताच झाडावर राहणारे अनेक पक्षी जीव वाचवण्यासाठी उडून जातात. मात्र काही पक्ष्यांची पिल्लं आणि अंडी झाडांवरील घरट्यांमध्ये असल्याने त्यांना त्यावेळी उडता येत नाही. अशा अनेक पक्षांचा झाडं पडताना त्याखाली अडकले जातात आणि चिरडून त्यांचा मृत्यू झाली. अनेक पक्षांची घरटी आणि अंडी खाली पडून नष्ट झाली. हे पाहताना उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.
पक्षांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
या घटनेबाबत केरळ वन विभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या अहवालानुसार अधिकृत मान्यता न घेता हे झाड तोडण्यात आलं. पोलिसांनी कारवाई करत जेसीबी चालकावर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्तीला अटक केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री मुहम्मद रियास यांनीही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अहवाल मागवला आहे. मात्र आपण असंच आणखी किती दिवस आपल्या फायद्यासाठी प्राण्यांच्या आयुष्यासोबत खेळणार आहोत, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.
हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
भारतीय वन सेवेचे अधिकारी प्रवीण कासवान यांनीही हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'प्रत्येकाला घराची गरज आहे. आपण किती क्रूर असू शकतो.' हा 44 सेकंदांचा व्हिडीओ काही तासांत 10,000 हून अधिक वेळा रिट्विट झाला. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.