2500 Years Old Coffin Video : तुम्ही अनेकदा 'ममी'बाबत चित्रपट किंवा सोशल मीडियावर ऐकलं किंवा पाहिलं असेल. ममीसंबंधित असाच एख व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. इजिप्तमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांनी 2500 वर्षांपूर्वीची बंद शवपेटी उघडली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 2500 वर्षांनंतर पहिल्यांदाच ही ताबूत म्हणजे शवपेटी उघडण्यात आली आहे.
सोशल मीडियावर 2020 सालचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांनी 2500 वर्षांपूर्वीची बंद शवपेटी उपस्थित पर्यटकांसमोर उघडली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार 2020 मध्ये इजिप्तमध्ये 59 बंद शवपेट्या सापडल्या होत्या. यापैकी एक शवपेटी शास्त्रज्ञांनी उघडली होती. हे पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं गर्दी झाली होती. शवपेटीमधील ममी आणि इतर वस्तू सुरक्षित होत्या.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शवपेटी शेजारी पुरात्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह अनेकांची गर्दी आहे शवपेटी उघडताच लोकांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये उघडलेली शवपेटी 2500 वर्षे जुनी आहे. 2500 वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेली शवपेटी पहिल्यांदाच उघडण्यात आली होती.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
तानसू येगेन नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'इजिप्तमधील पुरातत्वशास्त्रज्ञांनी 2020 मध्ये 2500 वर्षांपूर्वी बंद केलेली प्राचीन शवपेटी उघडली.' हा व्हिडीओ 10 ऑगस्ट रोजी ट्विटवर पोस्ट करण्यात आला असून आतापर्यंत 2.4 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओला 63 हजारांहून अधिक लोकांनी लाईक्स मिळाले आहेत.
काही दिवसांपूर्वीही सापडल्या प्राचीन शवपेट्या
गेल्या जून महिन्यामध्ये कैरोजवळ काम करणाऱ्या पुरातत्वशास्त्रज्ञांना शेकडो प्राचीन इजिप्शियन शवपेट्या आणि सुमारे 2500 वर्षे जुन्या देव-देवतांच्या कांस्य मूर्ती सापडल्या आहेत. शवपेटीमध्ये ममी आणि इतर वस्तू सुरक्षित आहेत.
इतर संबंधित बातम्या