World's Most Beautiful Preserved Person : तुम्ही आतापर्यंत ममीबद्दल (Mummy) नक्कीच ऐकलं असेल. कधी चित्रपटांमुळे तर कधी संशोधनामुळे आपल्याला ममीबाबत कानावर येतं. पुरातन काळात मृत व्यक्तीचं शरीर संरक्षित करुन ठेवण्यासाठी त्यावर रायायिनक प्रक्रिया करण्यात यायची यालाच 'ममी' असं म्हटलं जातं. तुम्ही आतापर्यंत अनेक ममीबद्दल ऐकलं असेल, काही ममी शेकडो वर्ष जुन्या असून त्यावर संशोधन सुरु आहे. दरम्यान तुम्ही जगातील सर्वात सुंदर ममीबद्दल ऐकलं आहे का? नसेल तर आम्ही आज तुम्हाल जगातील सर्वात सुंदर ममीबद्दल सांगणार आहोत. ही ममी 100 वर्षांनंतरही पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे या ममीला जगातील सर्वात सुंदर ममी असं म्हटलं गेलं आहे.


जगातील सर्वात सुंदर ममी


इटलीमध्ये 100 वर्षांपूर्वी दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला, त्यानंतर तिचं शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी तिची ममी बनवून घेतली. या मुलीचं नाव रोसालिया लोम्बार्डो (Rosalia Lombardo) असं आहे. रोसालियाचा न्यूमोनियामुळे 02 डिसेंबर 1920 रोजी मृत्यू झाला. पण अद्यापही रोसालियाची ममी पूर्णपणे सुरक्षित स्वरुपात आहे. या ममीला जगातील सर्वात सुंदर ममी नाव देण्यात आलं आहे. रोसालियाची ममी पाहताना असं वाटतंच नाही की, ही ममी आहे. रोसालियाची ममीकडे पाहिल्यास एक लहान मुलगी झोपलेली असल्याचं वाटतं. त्यामुळे या ममीला स्लिपिंग ब्युटी (Sleeping Beauty Mummy) असंही म्हणतात.




काचेच्या पेटीत संरक्षित आहे रोसालियाचं शरीर


रोसालिया लोम्बार्डो (Rosalia Lombardo) ही ममी सध्या इटलीमध्ये आहे. इटलीमधील उत्तरी सिसिलीच्या (Northern Sicily) पालेर्मोतील (Palermo) कॅपुचिन कैटाकॉम्ब्स (Capuchin Catacombs) येथे ही ममी आहे. कॅपुचिन कैटाकॉम्ब्स (Capuchin Catacombs) येथे सुमारे 8000 इतर ममी संग्रहित करत प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रोसालियाचीही ममी आहे. पण रोसालियाच्या ममी व्यतिरिक्त इतर कोणतीही ममी सुरक्षित अवस्थेत नाही. रोसालियाचं शरीर संरक्षित ठेवण्यासाठी ते एका काचेच्या पेटीत नायट्रोजन गॅस भरून त्यात ठेवलेलं आहे.


100 वर्षांनंतर फक्त मेंदूच्या आकारात बदल


रोसालियाचं शरीर 100 वर्षानंतरही सुरक्षित आहे. तिची त्वचा आणि केस अद्यापही सुरक्षित आहेत. स्कॅन आणि एक्स-रेमध्ये आढळून आलं की, रोसालियाच्या शरीराची संरचना आणि अवयव 100 वर्षांनंतर व्यवस्थित आहेत. फक्त तिचा मेंदू त्याच्या मूळ आकाराच्या 50 टक्के संकुचित झाला होता.


इतर संबंधित बातम्या