Anand Mahindra: सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल (Photo Viral) होत असतात. कधी मजेशीर व्हिडीओ तर कधी संदेश देणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतात. सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्या माध्यमातून नेटकरी विविध पोस्ट शेअर करुन लोकांचे मनोरंजन करत असतात. भारतामधील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. ते विविध व्हिडीओ आणि फोटो ट्विटरवर शेअर करत असतात. नुकताच आनंद महिंद्रा यांनी बंगळुरू (Bengaluru) येथील एका हॉटेलमधील व्हिडीओ ट्विटरवर (Twitter) शेअर केला. या व्हिडीओमध्ये एका वेटरनं हातात जवळपास डोशाच्या 16 प्लेट्स घेतलेल्या दिसत आहेत. त्यानं या डोशाच्या प्लेट्स एका हातात धरलेल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करुन आनंद महिंद्रा यांनी त्या वेटरचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


आनंद महिंद्रा यांनी शेअर केला व्हिडीओ


आनंद महिंद्रा यांनी एका वेटरचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्या वेटरनं 16 डोशाच्या प्लेट्स एका हातात धरलेल्या दिसत आहेत. या व्हिडीओला आनंद महिंद्रा यांनी कॅप्शन दिलं, 'वेटर प्रोडक्टिव्हिटी’ला ऑलिम्पिकमध्ये खेळ म्हणून मान्यता मिळायला हवी. हा व्यक्ती त्या स्पर्धेत सुवर्णपदकांचा दावेदार असेल'. 


व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती 


आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. हा व्हिडीओ 2 मिलियनपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिला आहे. तर या व्हिडीओला 42 हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेकांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं या व्हिडीओला कमेंट केली, 'अद्भूत' तर दुसऱ्यानं 'Superb' अशी कमेंट केली. 


पाहा व्हिडीओ: 






हा व्हिडीओ बंगळुरू येथील विद्यार्थी भवन या हॉटेलमधील आहे. या हॉटेलमध्ये डोसा, इडली असे विविध साऊथ इंडियन पदार्थ मिळतात. जगभरातील खवय्ये येथील चविष्ट पदार्थ खाण्यासाठी येत असतात. या हॉटेलमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.


महत्वाच्या इतर बातम्या:


Anand Mahindra : आम्ही भूकंप, दुष्काळ, दहशतवादी हल्ल्यांचा मुकाबला करताना खूप पाहत आलोय, एवढंच सांगतो, कधीच भारताच्या नादी लागू नका; आनंद महिंद्रांनी सुनावलं