मुंबई : सध्या जगाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट पोहोचलं आहे. इंटरनेटमुळे संपूर्ण जग जवळ आलं आहे. जगभरातील बहुतांश लोकांकडे सध्या स्मार्ट फोन आणि इंटरनेट सुविधा आहेत. इंटरनेट सुविधा मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला पैसे मोजावे लागतात. पण तुम्हाला माहित आहे का, जगात असाही एक देश आहे जिथे संपूर्ण देशासाठी इंटरनेट सुविधा मोफत आहे. एवढेच नाही तर इथे मतदानही ऑनलाईन होतं आणि या देशात सायबर गुन्हेही शून्य आहेत. या देशाबद्दल सविस्तर माहिती वाचा.
या देशात मोफत इंटरनेट सुविधा
युरोपमधील एका देशात इंटरनेट सुविधा मोफत आहे. एस्टोनिया हा युरोपमधील एक छोटासा देश आहे. या देशात लोकांना इंटरनेट वापरण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही. येथे इंटरनेट सुविधा पूर्णपणे फ्री आहे. या देशात प्रत्येक सुविधा ऑनलाइन उपलब्ध आहे. एस्टोनिया हा संपूर्ण जगात मोफत इंटरनेट वापरासाठी एक मॉडेल देश आहे, असं फ्रीडम हाऊस या अमेरिकन गैर-सरकारी संस्थेने अहवालात म्हटले आहे. टॅक्स रिटर्न भरण्यापासून ते कार पार्किंगसाठी पैसे भरण्यापर्यंत एस्टोनियन नागरिकही ऑनलाइन पैसे भरतात.
24 वर्षांपासून इंटरनेट सुविधा मोफत
इंटरनॅशनल ब्रॉडबँड स्पीड इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनुसार, नॉर्वेमध्ये सर्वाधिक नेट स्पीड आहे. आकडेवारीनुसार, मोबाइल फोनचा सरासरी इंटरनेट स्पीड गेल्या वर्षी 69 टक्क्यांनी वाढला होता. सध्या ते 52.6 मेगाबाइट्स प्रति सेकंद आहे. सोप्या भारतीय भाषेत 400 MB चा चित्रपट डाउनलोड करण्यासाठी फक्त 8 सेकंद लागतील. मिळालेल्या माहितीनुसार, 2000 पासून एस्टोनिया देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. येथील जवळपास 90 टक्के लोक इंटरनेट कनेक्टिव्हिटी वापरत आहेत. एवढेच नाही तर येथे निवडणुकीतील मतदानही ऑनलाइन होते.
सायबर गुन्ह्यांच्या धोका शून्य
इंटरनेटची मोफत उपलब्ध असताना सायबर गुन्हे सर्वाधिक असण्याची शक्यता तुम्हाला वाटत असेल, पण एस्टोनिया देशाची खास गोष्ट म्हणजे देशात सर्वत्र मोफत वाय-फाय असूनही येथे सायबर गुन्हे नगण्य आहेत. एस्टोनियन सरकार (Estonia Government) इंटरनेटच्या योग्य वापराबाबत वेळोवेळी मोहिमा राबवत असते. इंटरनेट मोफत असले तरी अनेक गोष्टींवर बंधने आहेत. जुगार कायद्यांतर्गत, कोणत्याही देशी आणि विदेशी जुगार साइटसाठी विशेष परवाना आवश्यक आहे. याशिवाय, जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एस्टोनिया हा निवडक देशांपैकी एक आहे जिथे हवेची गुणवत्ता (AIQ) सर्वोत्तम आहे.