Nagpur News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) जानेवारी 2023 मध्ये लिपिक आणि टंकलेखक या पदासाठीची जाहिरात काढत त्याच वर्षी एप्रिल महिन्यात पूर्व आणि डिसेंबर महिन्यात मुख्य परीक्षा ही घेतली होती. त्यामुळे परीक्षार्थींना 2024 मध्ये आपण नोकरीवर रुजू होऊ, असे वाटत होते. मात्र, आता परीक्षेला अडीच वर्षांचा कालावधी लोटला, तरी अद्यापही अंतिम निकाल लागलेला नाही. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेच्या नावाखाली पुन्हा एकदा आमचा निकाल लांबवण्याची एमपीएससीची तयारी असल्याचं या परीक्षार्थींना वाटतय. परिणामी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे हजारो परीक्षार्थी नैराश्याच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे विविध नेत्यांच्या दारावर जाऊन हे विद्यार्थी आता निकाल लावण्याची विनंती करत असल्याचे बघायला मिळात आहे. 

Continues below advertisement


वेगवेगळ्या जिल्ह्यातील परीक्षार्थी वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींच्या दारावर


पुढे आलेल्या माहितीनुसार, लिपिक व टंकलेखक पदासाठीची परीक्षा बहुतांशी ग्रामीण भागातील परीक्षार्थींनी दिली आहे. एका परीक्षेच्या निकालासाठी अडीच वर्ष थांबण्याची संधी ग्रामीण आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे अनेकांनी निकालाची वाट पाहण्यापेक्षा मिळेल तो रोजगार स्वीकारत आयुष्यात वेगळी वाट धरली आहे. विदर्भात सध्या हे परीक्षार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींच्या दारावर जाऊन आमचा निकाल लवकर लावा, अशी विनंती करत आहेत. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात पोहोचलेल्या अशाच लिपिक व टंकलेखक परीक्षेच्या परीक्षार्थींची आपली कैफियत मांडली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची बाजू लोकप्रतिनिधि कितपत लावून धरतात आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यावर काय निर्णय घेतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


लिपिक व टंकलेखक परीक्षेचीची लांबलेली टाइमलाईन 


-तब्बल 7007 पदांसाठी जाहिरात जानेवारी 2023 मध्ये आली
- 30 एप्रिल 2023 रोजी पूर्व परीक्षा पार पडली.
- 17 डिसेंबर 2023 रोजी मुख्य परीक्षा पार पडली.
- टायपिंग कौशल्य परीक्षा चार ते 13 जुलै 2024 दरम्यान पार पडली.
- मात्र अद्यापही अंतिम निकाल म्हणजेच अंतिम निवड यादी जाहीर केलेली नाही


खूप मानसिक त्रास होताय 


एमपीएससी लिपिक टंकलेखक परीक्षेचा अंतिम निकाल अद्याप लागलेला नाही. जानेवारी 2023  मध्ये जाहिरात, एप्रिल 2023  मध्ये पूर्वपरीक्षा, डिसेंबर 2023  मध्ये मुख्य परीक्षा आणि जुलै 2024 मध्ये टायपिंग कौशल्य परीक्षा पार पडली. परीक्षार्थींमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. "खूप मानसिक त्रास होताय सर्वांनाच," असे एका परीक्षार्थीने सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आणखी विलंब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



इतर महत्वाच्या बातम्या 



 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI