नागपूर: जुलै महिन्यात झालेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थतीसह शेतपीकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक पूर्व विदर्भातील नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर येणार आहे. मात्र हे पथक केवळ तीन जिल्ह्याचा आढावा घेणार असून नागपूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार नसल्याचे समोर आले आहे. यामुळे नुकसानीच्या पाहणीतून नागपूर जिल्ह्याला वगळल्याने लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यानीही संताप व्यक्त केला. 


केंद्रीय पथकाने नागपूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घ्यावा, अशी मागणी लोकप्रतिनिधी व शेतकरी करीत आहेत. जुलै महिन्यात सुमारे 600 मिमी हून अधिक पाऊस झाला, अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. जुलै महिन्यातच दोन पेक्षा जादा वेळा सर्वच नद्यांना पूर गेले. शेती, रस्ते खरडून निघाले. पूल व घरे पडून नुकसान झाले. तर पुरात वाहून नागरिकांचा मृत्यू झाला व जनावरे दगावली. मात्र त्यानंतरही केंद्रीय पथक नागपूर जिल्ह्यात पाहणी करणार नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संततधार पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा विरोधकांनी घेतलाच शिवाय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनीही दौरा केला होता.


Nagpur : वाघ आणि बिबट्याच्या अवयवांची सर्वाधिक तस्करी, वर्षभरात 177 आरोपींना अटक


नागपुरातील नुकसानीचा आढावा नको 


केंद्रीय पथकात 7 अधिकाऱ्यांचा समावेश असून पाहणीत चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. सोमवारपासून केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा सुरू झाला.  2 व 3 ऑगस्टला केंद्रीय पथक प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. तर गुरुवारी 4 ऑगस्टला विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेणार आहे. यावेळी नागपूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती देण्यात आली. मात्र, माहिती, आढावा व प्रत्यक्ष पाहणीत फरक आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची पाहणी करावी केवळ आढावा घेउ नये अशी मागणी लोकप्रतिनिधी व शेतकरी करीत आहेत.


CNG Price Hike : नागपुरात पेट्रोल आणि डिझेलपेक्षा महाग विकलं जातंय सीएनजी