नागपूरः जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार दिवसभरात नागपूर जिल्ह्यात 138 नव्या बाधितांची नोंद झाली. यात शहरातील 109 तर ग्रामीणमधील 29 बाधितांचा समावेश आहे. यासह सक्रिय बाधितांचा आकडा 718 वर पोहोचला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात 17 नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढल्याने आता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजनबद्ध उपाय योजनेची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


20 बाधित रुग्णालयात भरती


कोरोना बाधितांच्या संख्येसह रुग्णालयात भरती रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. सध्या 20 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाधितांपैकी सर्वाधिक 9 रुग्णांवर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर 1 रुग्ण मेयो रुग्णालयात, 2 किंग्सवे हॉस्पिटलमध्ये, एक रुग्ण सनफ्लावर हॉस्पिटलमध्ये, 1 रुग्ण सेंट्रल क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये, 1 ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये, 1 बाधित स्टार सिटी रुग्णालयात 1 रुग्ण रेल्वे हॉस्पिटलमध्ये तर 3 रुग्णांवर मेडिट्रीना रुग्णालयात उपचार घेत आहेत. नागरिकांनी स्वतः आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.


जिल्ह्यात 1615 चाचण्या


शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात 1615 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यापैकी शहरात 1185 तर ग्रामीणमध्ये 430 चाचण्या करण्यात आल्या. तर आज दिवसभरात 621 अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या. यात शहरात 239 तर ग्रामीणमधील 382 चाचण्या करण्यात आल्या.


भंडारामध्ये 15 तर वर्धेत 10 नवे बाधित


नागपूर विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यात 15, चंद्रपूर जिल्ह्यात 4, गोंदिया जिल्ह्यात 2, वर्धेत 10 आणि गडचिरोली येथे 4 नवीन कोरोना बाधित आढळून आले. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे विशेष.


इतर महत्वाच्या बातम्या


Mumbai Corona Update : मुंबईत शुक्रवारी 530 रुग्णांची नोंद, 976 कोरोनामुक्त


Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी 2944 नव्या रुग्णांची नोंद, सात जणांचा मृत्यू