Armed Robbery at State Bank: एखादा चित्रपटातील थरार सुद्धा लाजवेल अशा पद्धतीने कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील चडचणमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवरती सशस्त्र दरोडा टाकून तब्बल एक कोटी चार लाख आणि 20 किलो सोनं लुटल्याने अवघा कर्नाटक हादरला आहे. या लुटीमुळे कर्नाटकामध्ये एकच खळबळ उडाली असून दरोडेखोरांचा तपास करण्यासाठी सांगली पोलीस, सोलापूर ग्रामीण पोलीससह कर्नाटक पोलीस गुंतले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात लूट झाल्याने बँकांमध्ये घबराट पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच कॅनरा बँक सुद्धा अशाच पद्धतीने लुटण्यात आली होती. 

Continues below advertisement


आरोपी पळून जाताना वेगवेगळ्या दिशेनं पळाले


स्टेट बँक लुटल्यानंतर एका चोरट्याची कार सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेवढा तालुक्यातील हुलजंतीमध्ये एकाला धडकली. यावेळी ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केला. यावेळी कार त्याची लोकवस्तीत घुसली. हा थरार पाहिल्यानंतरह असं वाटलं होतं की हा अपघात असावा. मात्र, नंतर ही लुटीतील कार असल्याचं लक्षात आलं. मात्र, चोरट्यानं मुसळधार पाऊस आणि अंधाराचा फायदा घेत पळून गेला. मात्र इतर आरोपी पळून जाताना वेगवेगळ्या दिशेनं पळून गेले आहेत. त्यामुळे दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुद्धा केल्याचे दिसून येत आहे. 


1 कोटी 4 लाख आणि 20 किलो सोनं लुटलं


 स्टेट बँकेमधील दिवसाचे कामकाज संपत असतानाच एक जण येऊन बँकेची रेकी करत होता. तसेच बँकेतील माहिती सहकाऱ्यांना देत होता. त्यानंतर सहकाऱ्यांनी मास्कसह बँकेमध्ये प्रवेश करतात कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास एक तास बँक लुटली. या लुटीमध्ये सोनं, कागदपत्र, रोकड असा कोट्यवधींचा मुद्देमाल लुटला. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांनी 1 कोटी 4 लाख आणि 20 किलो सोनं लुटलं आहे. 


लूट केल्यानंतर सर्व आरोपी एकत्र एका ठिकाणी जमले आणि त्यानंतर त्यांनी लुटीचा माल वाटून घेत वेगवेगळ्या दिशेने धाव घेतली. त्यामधील एकजण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हुलजंतीच्या दिशेने येत होता. मात्र एकाला धडक दिल्याने गावातील ग्रामस्थांनी पाठलाग केला. त्यामुळे कार लोकवस्तीमध्ये घुसली. कुठे जायचं अंदाज न आल्याने हातात पैशाची बँग घेत त्यानं बंदुकीचा धाक दाखवला. यावेळी काही पैसे रस्त्यावरही पडले होते. मुसळधार पाऊस आणि अंधाराचा फायदा घेत तो त्यानंतर फरार झाला. ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस, कर्नाटक पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. 


इतर महत्वाच्या बातम्या