Latur Crime News : लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावात मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याची हृदय पिळवून टाकणारी घटना उघडकीस आलीय. यात कॉलेजच्या फीससाठी (College fees) पैसे न दिल्याचा राग मनात धरून 24 वर्षीय मुलाने काठीने डोक्यात वार (Latur Crime News) करत स्वतःच्या जन्मदात्याची हत्या केलीय. सततचा पाऊस असल्यानेचुलीतजाळायला लाकूड मिळालं नाही. म्हणून गॅस सिलेंडरसाठी पैसे खर्च करणाऱ्या कुटुंबावर दुःखद प्रसंग ओढवलाआहे. कॉलेजची फी सिलेंडरसाठी खर्चले म्हणून मुलानेच बापाचा निर्घृणपणे खून केलाआहे.
मिळालेल्यामाहितीनुसार, मयत देविदास पांचाळ (वय 70) हे गरीब परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता. त्यांचा मुलगा चापोली येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. अलीकडेच त्याने वडिलांकडे कॉलेज फीस भरण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र सततच्या पावसामुळे घरातील जळतन भिजले होते, तसेच गॅसही संपल्याने आईने गॅस खरेदीसाठी पैसे खर्च केले. तर सतत होणाऱ्या पावसामुळे भाजीपाला विक्रीच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. परिणामी आर्थिक ओढाताण वाढली होती. त्यामुळे फीससाठी पैसे शिल्लक राहिले नव्हते.
रागाच्या भरात मुलाने काठी वडिलांच्या डोक्यावरमारली, अन्....
दरम्यान, यावरून मुलाने वडिलांशी वाद घातला. आईने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु रागाच्या भरात मुलाने घरातील काठी उचलून वडिलांच्या डोक्यात घालून मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या देविदास पांचाळ यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, चाकूर येथे दाखल करण्यात आले. मात्र डोक्यातील मार गंभीर होता. सतत होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हृदयद्रावक घटनेमुळे हिंपळनेर परिसरात शोककळा
घटनेनंतर शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकून पोलीस पाटलांना खबर दिली. यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर मुरकुटे घटनास्थळी दाखल झाले. पुढे पोलीस उपअधीक्षक रवींद्र चौधर, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे तसेच लातूर येथील मोबाईल फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. सध्या आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे हिंपळनेर परिसरात शोककळा पसरली असून “पोटासाठी झगडणाऱ्या बापाचा जीव कॉलेज फीससाठी मुलाने घ्यावा, ही समाजमनाला चटका लावणारी घटना” अशी चर्चा होत आहे.
हेही वाचा
