नागपूरः जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन संवर्गाच्या नवीन रूपातील (बीए 2.75) विषाणूचा धोका वाढला आहे. कोरोनाच्या नवीन उपप्रकारचे नागपूर जिल्ह्यात 17 रुग्ण आढळले आहेत. मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या नवीन उपप्रकाराचे नागपूर जिल्ह्यात 17 आढळले आहेत. मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या नवीन उपप्रकारच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे प्रशासनासह आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील (नीरी) जनुकीय चाचणी प्रयोगशाळेत हे नमुने तपासण्यात आले आहेत.


राज्यात बीए 2.75 या कोरोनाच्या उपप्रकाराच्या 30 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील तब्बल 20 नागपूर विभागातील असून 17 नागपूर जिल्ह्यातील आहेत. नागपुरातील नीरीच्या प्रयोगशाळेत आढळलेले या उपप्रकाराचे रुग्णांचे नमुने 15 जून ते 5 जुलै या कालावधीत आढळून आले आहेत. एकूण रुग्णांमध्ये 11 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. विशेष असे की, या रुग्णांपैकी 17 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. यामुळे रुग्णांना सौम्य लक्षणे होती. काही रुग्णांमध्ये लक्षणे नसल्याची माहिती पुढे आली आहे.


जिल्ह्यात 643 कोरोनाबाधित सक्रिय


मागिल काही दिवसात नागपूर शहरात आणि जिल्ह्यात दररोज शंभरावर रुग्ण आढळून येत आहे. दिवसभरात शहरात 1 हजार 524 आणि ग्रामीणमध्ये 448 अशा जिल्ह्यात 1 हजार 972 चाचण्या झाल्या. त्यापैकी 5.99 टक्के म्हणजेच 118 जण कोरोनाबाधित आढळून आले. यात शहरातील 84 आणि ग्रामीणमधील 34 जणांचा समावेश आहे. तर 90 जणांनी कोरोनावर मात केली. सध्या शहरात 443 आणि ग्रामीणमध्ये 200 असे जिल्ह्यात 643 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. 18 जणांना लक्षणे असल्याने ते मेयो, मेडिकलसह इतर शासकीय व खासगी रुग्णालामध्ये उपचार घेत आहेत. लक्षणे नसलेले 625 जण गृह विलगीकरणात आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या


Shinzo Abe : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार, प्रकृती गंभीर


Sugar Exports : साखर निर्यातीबाबत कारखानदारांना दिलासा, 8 लाख मे टन निर्यातीला मुदतवाढ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय