Vasai Virar Municipal Corporation: वसई विरार महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून अनधिकृत इमारतीचा सज्जा कोसळून जखमी झालेल्या महिलेच्या मृत्यूनंतर अखेर वसई पालिका प्रशासनास जाग आली. आज इमारतीवर तोडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पोलिसांचाही भोंगळ कारभार माणिकपूर पोलिसांनी महिलेच्या मृत्यूप्रकरणी अवैध्य बांधकाम करणाऱ्या बिल्डरला सोडून ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. 


एका महिलेच्या मृत्यूनंतर वसई विरार पालिका प्रशासनाला जाग आली आहे आणि पालिका या अनधिकृत बांधकामावर आता तोडक कारवाई करत आहे.  वसईच्या एच प्रभाग क्षेत्रात माणिकपूर अर्बन बॅंकेच्या समोर सोमवारी, 20 मार्चला इमारतीचा सज्जा रिक्षावर कोसळून दोन जण जखमी झाले होते. यात महिला रेणू गुप्ता ही गंभीर जखमी झाली होती. यात रेणू गुप्ता हिचा लहान मुलगा वाचलाही होता. 


बुधवारी उपचारादरम्यान रेणू गुप्ता हिचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झाल्यानतंर पालिका प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी आज अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई करण्यास सुरुवात केली. वास्तविक स्थानिक नागरिकांनी वर्षभरापूर्वी या अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र पालिका प्रशासनाने यावर कानाडोळा केला होता. आता मात्र महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पालिकेला जाग आली असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 


मयत महिला रेणू गुप्ता हिला चार मुलं आहेत. ती भाजीपाला विकून आपल्या घरचा उदरनिर्वाह करायची. माणिकपूर पोलिसांनी बिल्डरला सोडून, ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. मयत महिलेच्या नातेवाईकांनी पालिकेचे अधिकारी आणि बिल्डरावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 


मुलाच्या आत्महत्येनंतर आईचीही आत्महत्या 


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकाच कुटुंबात आधी मुलाने आणि आता आईने आत्महत्या करुन आपले जीवन संपवले आहे. पैठण तालुक्यातील शिवनाई गावातील ही घटना असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकुलत्या एक 17 वर्षीय मुलाने अज्ञात कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र मुलाचा विरह सहन न झाल्याने आईनेही घरातील बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. रितेश रमेश काळे (वय 17 वर्षे, रा. शिवनाई, पैठण) असे मुलाचे तर रुखमनबाई रमेश काळे असे आत्महत्या करणाऱ्या आईचे नाव आहे. 


ही बातमी वाचा: