ठाणे : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत 6 दिवसांच्या गणपती बाप्पांना मुंबई निरोप दिला जात आहे. येथील जुहू चौपाटीवर सहा दिवसाच्या गौरी गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे.मुंबईच्या जुहू चौपाटीवर गौरी गणपती विसर्जनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, देशभरात विशेषत: महाराष्ट्रात आजही गणेशोत्सवाची (Ganeshotsav) धूम पाहायला मिळत असून गावोगावी, शहराशहरात गणपती बाप्पांसमोर उभारण्यात आलेल्या देखाव्यांचे उद्घाटन केले जात आहे. गणेशभक्त आणि नागरिक हे देखावे पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. गणपती (Ganesh) बाप्पा सर्वांसाठी विघ्नहर्ता आहेत, त्यामुळे जाती-धर्माच्या भिंती तोडून एकोपा या उत्सवात पाहायला मिळतो. तर, तृतीयपंथीय देखील गणपती बाप्पांचे जल्लोषात स्वागत करतात. भिवंडी शहरातील गायत्रीनगरमधील तृतीयपंथीय समुदायाने यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. 


शहरातील अनेक तृतीयपंथीयांनी एकत्र येऊन त्यांनी गणरायाची प्रतिष्ठापना धुमधडाक्यात केली आहे. यंदाच्या गणेशोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे समाजात तृतीयपंथीयांना समान वागणूक मिळावी यासाठी बाप्पाकडे विशेष साकडे घातले आहे. तृतीयपंथीय समाजातील सदस्यांनी अशी मागणी केली आहे की, ज्या नजरेने पुरुष आणि महिलांकडे पाहिले जाते, त्याच नजरेने आमच्याकडेही पाहावे. समाजातील अनेकजण आमच्यावर टोमणे मारतात, हिनवतात, आणि त्यामुळे आम्हालाही योग्य सन्मानाने वागणूक मिळावी, अशी आमची इच्छा आहे, असे तेथील तृतीयपंथीयांनी म्हटलंय. तृतीयपंथीयांनी गणपतीसोबत गौरीचीही प्रतिष्ठापना केली आहे. दररोज सकाळ-संध्याकाळ बाप्पाची आरती आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित केला जातो, ज्यामध्ये तृतीयपंथीय उत्साहाने सहभागी होतात. बाप्पाच्या आगमनामुळे त्यांच्यात आनंदाची लाट उसळली आहे, आणि पूजा-आरती करत नाचत-गाजत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्याचबरोबर  भंडाराचे आयोजनही करण्यात आले आहे. यावर्षी तृतीयपंथीयांनी समाजात आपल्याला योग्य सन्मान मिळावा, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्व तृतीयपंथीयांपर्यंत पोहोचावा, अशी प्रार्थना बाप्पाकडे केली आहे. यजमान सुखी रहावेत आणि समाजात तृतीयपंथीयांना मान मिळावा, अशा शब्दांत त्यांनी बाप्पाला साकडे घातले आहे.


6 दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन


मुंबईतील जुहू चौपाटी परिसरात 5 दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन केले जात आहे, गणेश भक्तांची गर्दी पाहता मुंबई पोलिसांनी संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त केले आहेत. त्यासोबत मुंबई महापालिकेकडून देखील जय्यत तयारी जुहू परिसरात करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून मोठ्या संख्या जुहू चौपाटी परिसरात जीव रक्षक तैनात करण्यात आले आहेत. या जीव रक्षकांच्या माध्यमातून गणेश भक्तांच्या मूर्ती थेट समुद्रात विसर्जन केल्या जात आहेत.


हेही वाचा 


आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'