ठाणे : येथील घोडबंदर रोडवर (Ghodbunder Road) दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ओवळा सिग्नलजवळ एसटी बस (ST Bus) मेट्रोच्या (Metro) पिलरला धडकल्याची घटना घडली. या अपघातात (Thane Accident News) 11 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी रुग्णांवर ऑस्कर आणि टायटन रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. 


याबाबत अधिक माहिती अशी की, ठाण्याच्या घोडबंदर रोडवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसने मेट्रोच्या खांबाला जोरदार धडक दिली. या अपघातात 11 प्रवासी जखमी झाले आहेत. तर बसचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री हा अपघात झाला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समजू शकलेली नाही.


दुर्घटनेतील जखमींवर उपचार सुरु 


एसटी बसने पिलरला धडक दिल्याने बसच्या पुढील बाजूचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेतील जखमींवर ऑस्कर आणि टायटन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अग्निशामक दल वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बस बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. तर या अपघाताने घोडबंदर रोडवरील वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.


मानपाडा पुलावरही झाला होता अपघात 


दरम्यान, काही दिवसांपूर्वी नंदुरबार डेपोवरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बसला घोडबंदर रोडवर अपघात झाला होता. बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट दुभाजकावर चढल्याने हा अपघात झाला. घोडबंदर रोडवरील मानपाडा पुलावर ही घटना घडली होती. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दोन क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला काढण्यात आली होती.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Ajit Pawar : पुण्यातील संचेती पुलाखाली अपघात, अजितदादांनी तत्काळ ताफा थांबवला अन् अपघातग्रस्ताला दिला मदतीचा हात, पाहा व्हिडिओ


Nagpur Accident : नागपुरात परत एकदा भरधाव ऑडी कारचा थरार! कार भाजपच्या बड्या नेत्याच्या कुटुंबाशी संबंधित असल्याची चर्चा